Tuesday, April 12, 2011

marathi vinod

डॉक्टर : (पेशंटला) दिवसातून रोज दोन-तीन किलोमीटर पायी चालत फिरा. तब्येत चांगली राहील. पेशंट: काही फरक पडत नाही. दुसरं काही सांगा. मी पोस्टमन आहे.


असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

Friday, April 1, 2011

राशी-भविष्य

मेष
मन प्रसन्न होणार्‍या घटना घडतील. नोकरीत मनाजोगे काम मिळाल्यामुळे नव्या आशा पल्लवित होतील. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नवी दिशा मिळेल.

वृषभ

नोकरीत बदल करू इच्छिणार्‍या तरुणांना अनिश्चितता जाणवेल. आहे त्या नोकरीतच स्थैर्य लाभेल. ज्येष्ठांचा एखादा सल्ला मोलाचा ठरेल

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

मराठी विनोद

गंपू : फणस कसा दिला ? फळवाला : वीस रुपयांना. गंपू : पंधराला द्या. फळवाला : पंधराला तर त्याचं फक्त चारखंडच येईल.. गंपू : ठीकाय... हे पाच रुपये घ्या, चारखंड तुम्हालाच ठेवा, मला फक्त गरे द्या.

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य


पुनर्जन्म भाग - ४, हास्यवाटिका, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, निवास गुळवणी यांचा लेख

"ह्या केसचा मी सांगोपांग विचार केला आहे," इन्सपेक्टर मोडक आपल्या करडया केसांवरून एकवार हात फिरवत म्हणाले.
"आपले आणि मक्याचे काम झाले की त्याला गोळ्या घालाव्या लागतील."
"तुम्हाला देवानं काही अक्कल-विक्कल दिली आहे की नाही? तुम्ही माझ्या चिंगीवर गोळ्या झाडणार?...काय माणूस आहे. चला उठा हो s एक क्षण थांबायचं नाही आता इथं," चिंगीची आई लगबगीनं उठून उभी रहात म्हणाली.
"चुकलो, क्षमा करा. बसा वहिनी," मोडक कान पकडत म्हणाले. "मी मक्यादादाला मारण्याची योजना आखतोय. तुमच्या चिंगीला नव्हे."
"तुम्हाला या केसमधलं काहीच कळलेलं दिसत नाही. मक्यादादा कुठं बसलाय माहित आहे ना?"
"माहित आहे. तो चिंगीच्या मनात ठाण मांडून बसलाय. त्याला चिंगीच्या मनातून हाकलला की त्याचा मृत्यू होईल."

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

Wednesday, March 30, 2011

मराठी विनोद

राजू आणि विजू स्टेशनला येतात, तेवढ्यात ट्रेन सुटते. दोघेही ट्रेनच्या मागे पळू लागतात. शेवटी राजू कसाबसा गाडीत चढतो. गाडीतले लोक राजूला म्हणतात, 'शाब्बास! शेवटी तू ट्रेन पकडलीसच.' त्यावर राजू उत्तरतो, 'शाब्बास काय? ट्रेन विजूला पकडायची होती, मी तर सोडायला आलो होतो!'

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

पैसा कसा निर्माण होतो? भाग-१, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेख

राजकारण, तत्वज्ञान, कला-संस्कृती यांसारख्या बौध्दीक श्रमात मानव समाज स्वत:ला गुंतवून घेण्या अगोदर त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या भौतिक किमान गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. परंतु या गरजांची पुर्तता होण्यासाठी मानवाला श्रम करून उत्पादन करणे भाग असते आणि समाजाचे हे श्रम आणि त्याद्वारे होणारे भौतिक साधनांचे उत्पादन ह्या समाज विकासांचा पाया असतो. इतिहास म्हणजे एक नियमबध्द, नैसर्गिक व अटळ अशी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये एक समाजरचना जाऊन तिच्या जागी दुसरी नवी अधिक वरच्या पातळीची समाजरचना अस्तित्वात येते. सध्याच्या भांडवलदारी समाजरचनेतून नवी समाजवादी समाजरचा अस्तित्वात येईल. स्वत:च्या उत्पादन साधनांची मालकी,(कारखाने, यंत्रे व दळणवळणांच्या साधनांमुळे) नाहीशी झाल्यामुळे भांडवलदारी समाजातील श्रमिक हा अखेरीस केवळ आपल्या श्रमशक्तीचा, केवळ आपल्या श्रमांचा मालक उरतो आणि त्याद्वारे भौतिक मूल्ये उत्पादन करतो. स्वत: जगण्यासाठी आणि स्वत:वर अवलंबून असणा-या आपल्या कुटुंबियांना जगविण्यासाठी, उत्पादन साधनांवर मालकी असणा-या भांडवलदार वर्गाला आपली श्रमशक्ती विकून टाकणे त्याला भाग पडते.


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

आर्थिक सल्लागार का?, दामदुप्पट, गुंतवणूक सल्लागार, मनोहर दांडेकर यांचा लेख

मी एका प्रेसमधे तेथील एका कामगाराची विमा पॉलिसी काढण्यासाठी गेलो होतो. त्या कामगाराला मी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासूनच ओळखत होतो. अत्यंत कुशल व कारीगर असा तो कामगार त्याने आल्या आल्याच प्रेसमधील त्याच्या खात्याचा कायापालट केलेला मी पाहिला होता. माझे नेहमी असे बारकाईने निरिक्षण चालत असते, त्यात कोण माणूस काय बोलतो किंवा काय मजा मारतो कसा राहतो इत्यादींवर त्याची आर्थिक प्रगती दिसून येते व यावरून मला समोरच्या माणसाचे भविष्य कळते. त्याच्या जेवणाच्या सुट्टीतील उत्तरार्धातील वेळ मुख्य अर्ज भरण्यासाठी आम्ही ठरविला होता. त्याच प्रेसमधे गेले तीन चार वर्षे काम करणा-या अकाऊंटंटला मी चांगलाच ओळखत होतो. कोणाही व्यक्तीला त्याच्या छानछौकीवरून त्याला आर्थिक स्थैर्य असल्याची खात्री झाली असती. पण मी त्याला चांगलाच ओळखत होतो.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर