राजकारण, तत्वज्ञान, कला-संस्कृती यांसारख्या बौध्दीक श्रमात मानव समाज स्वत:ला गुंतवून घेण्या अगोदर त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या भौतिक किमान गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. परंतु या गरजांची पुर्तता होण्यासाठी मानवाला श्रम करून उत्पादन करणे भाग असते आणि समाजाचे हे श्रम आणि त्याद्वारे होणारे भौतिक साधनांचे उत्पादन ह्या समाज विकासांचा पाया असतो. इतिहास म्हणजे एक नियमबध्द, नैसर्गिक व अटळ अशी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये एक समाजरचना जाऊन तिच्या जागी दुसरी नवी अधिक वरच्या पातळीची समाजरचना अस्तित्वात येते. सध्याच्या भांडवलदारी समाजरचनेतून नवी समाजवादी समाजरचा अस्तित्वात येईल. स्वत:च्या उत्पादन साधनांची मालकी,(कारखाने, यंत्रे व दळणवळणांच्या साधनांमुळे) नाहीशी झाल्यामुळे भांडवलदारी समाजातील श्रमिक हा अखेरीस केवळ आपल्या श्रमशक्तीचा, केवळ आपल्या श्रमांचा मालक उरतो आणि त्याद्वारे भौतिक मूल्ये उत्पादन करतो. स्वत: जगण्यासाठी आणि स्वत:वर अवलंबून असणा-या आपल्या कुटुंबियांना जगविण्यासाठी, उत्पादन साधनांवर मालकी असणा-या भांडवलदार वर्गाला आपली श्रमशक्ती विकून टाकणे त्याला भाग पडते.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment