Friday, April 1, 2011

पुनर्जन्म भाग - ४, हास्यवाटिका, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, निवास गुळवणी यांचा लेख

"ह्या केसचा मी सांगोपांग विचार केला आहे," इन्सपेक्टर मोडक आपल्या करडया केसांवरून एकवार हात फिरवत म्हणाले.
"आपले आणि मक्याचे काम झाले की त्याला गोळ्या घालाव्या लागतील."
"तुम्हाला देवानं काही अक्कल-विक्कल दिली आहे की नाही? तुम्ही माझ्या चिंगीवर गोळ्या झाडणार?...काय माणूस आहे. चला उठा हो s एक क्षण थांबायचं नाही आता इथं," चिंगीची आई लगबगीनं उठून उभी रहात म्हणाली.
"चुकलो, क्षमा करा. बसा वहिनी," मोडक कान पकडत म्हणाले. "मी मक्यादादाला मारण्याची योजना आखतोय. तुमच्या चिंगीला नव्हे."
"तुम्हाला या केसमधलं काहीच कळलेलं दिसत नाही. मक्यादादा कुठं बसलाय माहित आहे ना?"
"माहित आहे. तो चिंगीच्या मनात ठाण मांडून बसलाय. त्याला चिंगीच्या मनातून हाकलला की त्याचा मृत्यू होईल."

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: