Wednesday, February 23, 2011

कोल्हापुरी तांबडा रस्सा

साहित्य:


१) मटण                   १ किलो
२) आलं-लसूण         १ चमचे
३) कांदा                    ४
४) तिखट
५) सुकं खोबरं          १ वाटी
६) कोथिंबीर
७) भाजलेले तीळ     १ चमचा
८) काजू वाटण         अर्धा कप
९) खसखस               १ चमचा
१०) मीठ                   चवीनुसार
११) वेलची                 २
२) धनेजिरे पूड        २ चमच
१३) लवंगा                ८

१४) दालचिनी           ४

१५) मिरी                  ४

१६) हळद

१७) टोमॅटो प्युरी     अर्धी वाटी
१८) तेल                   अर्धी वाटी


पूर्वतयारी:

१. मटण स्वच्छ धुवून घेणे. थोडा कांदा बारीक चिरून उरलेला कांदा उभा चिरून तळून घेणे.
२. आलं-लसूण वाटून घेणे. तीळ भाजून घेणे. सुकं खोबरं किसून तळून घेणे.
३. खसखस भाजून घेणे. काजूचे वाटण करून घेणे.
४. कांदा-खोबरं, तीळ, खसखस, लवंग, दालचिनी, मिरी, वेलची मिक्सरमध्ये वाटून घेणे.

कृती:
१. कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून चिरलेला कांदा परतावा. त्यात आलं-लसूण लावलेलं मटण टाकून परतून घ्यावं.
२. हळद, टोमॅटो प्युरी, मीठ टाकून पाणी टाकून मटण शिजवून घ्यावं.
३. दुस-या पातेल्यात तेल टाकून कांदा-खोबरं वाटण परतून घ्यावं.
४. शिजलेलं मटण व काजू वाटण टाकावं.
५. जरूरीनुसार कांदामसाला व मीठ-तिखट चवीनुसार टाकून शेवटी कोथिंबीर टाकावी.
६. गरमागरम लाल रस्सा भात किंवा ब्रेडबरोबर खायला द्यावा.

टीप:
कोल्हापुरी कांदा मसाला असल्यास तो वापरू शकता.


 अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद



















No comments: