Wednesday, February 23, 2011

व्यर्थ न हो बलिदान, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेख

समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना (आणि कर्मचा-यांना) त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते आणि शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुस-याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज एकेका दाण्यासाठी गरजवंत बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठेसाठी कापड उपलब्ध करणा-यांना आज कापड मिळत नाही. घाणेरडया झोपडयात राहून आपली जीवनलीला कित्येकजण समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार छोटयामोठया कारणांसाठी लाखो लोकांचे नशीब उलटेपालटे करू शकतात. ही अचानक विषमता आणि जबरदस्तीने लादला गेलेला भेदभाव जगाला एका भयंकर प्रलयाकडे खेचून नेत आहे. ही स्थिती अधिक काळ टिकून राहणे शक्य नाही. हे स्पष्ट आहे की, धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून रंगेल चैनबाजी करत आहे. आणि या शोषकांची निष्पाप मुले आणि कोटयवधी शोषित जनता एका भयानक दरीच्या काठावरून चालले आहेत.

संस्कृतीचा हा प्रासाद वेळीच सावरला गेला नाही तर लवकरच चक्काचूर होऊन तो जमीनदोस्त होईल. एका आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे आणि ज्यांना ही गोष्ट उमजली आहे त्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी साम्यवादी सिध्दांतावर आधारीत समाजाची पुनर्निर्मिती केली पाहिजे. जोपर्यंत हे केले जात नाही आणि माणसांचे माणसांकडून होणारे शोषण किंवा ज्याला आपण साम्राज्यशाही म्हणतो ते एका राष्ट्राचे दुस-या राष्ट्राकडून होणारे शोषण नष्ट केले जात नाही तोपर्यंत मानवतेची यातनांतून सुटका होणार नाही, आणि तोपर्यंत युध्द थांबवून विश्व शांतीचे युग निर्माण करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ ढोंग असण्याखेरीज दुसरे काही नाही.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: