साहित्य:
१) तांदूळ पाऊण किलो १२) खसखस २ चमचे
२) खिमा ४०० ग्रॅम १३) हिरवी मिरची १
३) काळे-मिरे १०-१२ १४) मसाला वेलची
४) पंढरपुरी डाळ २ चमचे १५) लवंगा ६-७
५) दही १ कप १६) आलं
६) मलई १ कप १७) कांदे ४-५
७) हिरव्या मिरच्या ७-८ १८) लसूण
८) कांदा 1 १९) खोबरं पाव कप
९) बदाम २०) पिस्ते
१०) केवडाजल २१) मीठ
११) तेल २२) केशर
पूर्वतयारी:
१. खिमा स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावा. कांदे उभे पातळ चिरून लाल रंगावर तळून काढावेत.
२. आलं-लसूण,मिरची बारीक वाटावी. तांदूळही धुवून निथळत ठेवावा.
३. तीन लवंगा,दोन मसाला वेलची,चार-पाच दाणे काळे-मिरे,पंढरपुरी डाळ,एक चमचा खसखस,एक चमचा किसलेलं खोबरं व अर्धा तळलेला कांदा हे सर्व बारीक वाटून घ्यावं व खिम्यात मिसळून त्याचे गोळे करावेत.
४. उरलेला गरम मसाला कांदा,खसखस,खोब-याचं वाटण करावं.
५. तेलात कोफ्ते तळून घ्यावेत.
६. तांदूळ साधारण शिजवून घ्यावा व त्यातलं पाणी निथळू द्यावं.
कृती:
१. एका भांडयात तेल गरम करून त्यात आलं-लसूण,मिरची वाटण घालून एक सेकंद परतावी.
२. त्यात दुसरं वाटण घालून फेटलेलं दही घालावं. तेल सुटेपर्यंत परतावं.
३.. मग त्यात फेसलेली साय घालावी. मीठ घालावं व तळलेले कोफ्ते घालून एक वाफ आणावी.
४. मसाला दाटसर असला पाहिजे. त्यात केशर घालावं.
५. जाड बुडाच्या भांडयात एक थर कोफ्त्याचा, तर एक थर भाताचा लावावा.
६. एक कप पाणी अधूनमधून शिंपडावं. सर्वात वर बदाम पिस्त्याचे काप, केशराचे धागे घालून झाकण लावावं.
७. झाकणाला कणीक भिजवून लावावी म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही व पुलाव दमपुख्त पध्द्तीने शिजेल.
८. वाढताना वरून तळलेला कांदा घालावा.
९. कोफ्ते जर फुटू लागले तर त्यात अंड घालावं. म्हणजे तळताना फुटणार नाही.
टीप:
१. महाभारतकाळापासून आजपर्यंत बनणारा हा प्रकार. तेव्हा याला ‘निष्टोदन’ हे नाव होतं. त्याचं कोफ्ता पुलाव हे नामांतर झालं.मध्ययुगात कोफ्त म्हणजे कुटलेला. मटन कुटून तयार केलेले गोळे-कोफ्ते घालून केलेला भात म्हणजे कोफ्ता पुलाव.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment