एक डाव भूतांचा भाग-१
पहिला डाव देवाचा किंवा भूताचा असे खेळांत लहानपणी करत असू. तसाच आजचा हा डाव भूतांना अर्पण करू या. पण ही भूते खेळांतली नसून पंचमहाभूते होय.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
पहिला डाव देवाचा किंवा भूताचा असे खेळांत लहानपणी करत असू. तसाच आजचा हा डाव भूतांना अर्पण करू या. पण ही भूते खेळांतली नसून पंचमहाभूते होय.
दृष्य जगत ह्या पंचमहाभूतांच्या कर्दमा पासून बनलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही ती पंचमहाभूते आहेत. या पंचमहाभूतांचा कर्दम बनून हे दृष्य जगत वा जड माया बनलेली आहे. आपण बघितली आहे की, परब्रह्माला"‘एको हं" चे स्फुरण झाले. हे स्फुरण म्हणजे त्या परब्रह्माची शक्ती असून तिलाच मूळमाया असे म्हणतात. पुढे त्यांतून गुणमाया निर्माण झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव निर्माण झालेत. ते प्रत्येकी एकेका गुणाचे अधिकारी व नियामक म्हणजेच ईश वा ईश्वर आहेत. त्यानुसार रजोगुणी ब्रह्माकडे निर्मितीचे काम आले तर सत्व गुणी विष्णूकडे पालन पोषणाचे कार्य दिले गेले व संहाराचे काम तमोगुणी शिवाकडे आले. येथपर्यंत या त्रिगुणांची साम्यता होती. पण पुढे तमो गुणाचा प्रादुर्भाव वाढला व त्यांतून आकाश निर्माण झाले, आकाशांतून-वायू, वायूमधून-तेज, तेजामधून-आप म्हणजे पाणी व आपमधून-पृथ्वी निर्माण झाली.
या पंचमहाभूतांचा कर्दम झालेला आहे आणि म्हणूनच त्याचे संतुलन टिकून आहे. अन्यथा दोन भाग पाणी व एक पृथ्वी म्हणजे केव्हाच विरून गेली असती. तिचे पंचिकरण झालेले आहे. प्रत्येक तत्वाचे दोन भाग करावे आणि अर्धा भाग ठेवून दुस-या अर्ध्या भागाचे बरोबर चार भाग करावेत आणि स्वत:च्या अर्ध्या भागास सोडून दुस-या तत्वाच्या पूर्ण अर्ध्या भागात म्हणवावे. म्हणजे प्रत्येक तत्व स्वत:च्या अर्ध्या भागाचे आणि दुस-या तत्वाचे चार भाग मिळून अर्ध्या भागाने असे पूर्ण झाले. यालाच सरळ अर्थ पृथ्वी असे घेतले तर त्यातील अर्धा भाग (५०%) पृथ्वीचा असून इतर प्रत्येक भूत १२.५% असे मिळून ४ तत्वाचे(भूताचे) ५०% म्हणजे बरोबर १००% होय.
No comments:
Post a Comment