Monday, February 14, 2011

दामूच्या गोंव्याक् वयता..., आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

प्रस्तावना : आप्पा कुलकर्णी


पंतांच्याच शब्दात बोलायचं तर असलेल्यांच्या यादीमधून ते नसलेल्यांच्या यादीत जाऊन बसले. पण त्यांच्या नसलेल्यापणाची सवय मात्र मला व्हायची आहे. माझ्यासारखाच ब-याच जणांचा हाच अनुभव असेल. काहीवेळा रोज जी माणसं आपल्याला भेटत नाहीत, त्यांच्याबाबतीत आपली अन्य व्यवधानं चालू असल्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या कोणत्याही विचारांचा प्रश्न येत नाही ते आहेत, इतरत्र कुठेतरी वावरत आहे त्या विचारानं मन शांत असतं. पंत तर सतत विहार करणारे, त्यामुळे ते बाहेर कार्यक्रमानिमित्त गेलेले आहेत. पुढच्या आठवडयात भेटतीलच, अशा कल्पनेनं कामं पार पडत असतात. काहीतरी आठवतं आणि वास्तवाची जाणीव होते. पंत परतणार नाहीयेत. त्यांचा आवाज प्रत्यक्ष आमोरा-समोर बसून ऐकता येणार नाहीये. सवय व्हायचीय त्यांच्या नसण्याची, सवय व्हायचीय. हिरमुसल्या मनानं कामं करतोय खरे काहीतरी तुटलेपण सलतंच आहे. सलत राहाणारच आहे.

पणशीकरांचा श्वास नाटक. नाटक म्हटलं कि दौरे आले. पंत किती किलोमीटर्स आणि कुठं कुठं फिरले हे सांगता येणं मुश्कील आहे. पण जिथं रस्ता तिथं महामंडळाची एश्टी तिथं तिथं पंतांची नाटकं सादर केली गेली. पंडित भिमसेन जोशी याच भटक्या जमातीतले. त्यांना स्वत:कार चालवण्याची खूप आवड. कितीही दूरचा प्रवास असला, तरी ते तो पल्ला पार करून मैफल रंगवायचे. पणशीकरांनी कधीही गाडी चालवली नाही पण दिवसा आणि रात्रीही ते ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर जागे राहिले-जागते राहिले. गाडीतले अवघे झोपलेले असले तरी ते जागे राहिले. भारतभर त्यांचे दौरे व्हायचेच पण महाराष्ट्र तर त्यांनी उभा अडवा पिंजून काढला होता. त्यामुळेच रात्री कितीही वाजता कुठंही थांबलं तरी गाडीतून बाहेर डोकावून सांगायचे इथं पुढच्या चौकातून गाडी उजव्या हाताला घे तिथलं हॉटेल रात्रभर उघडं असतं.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर



No comments: