Tuesday, February 1, 2011

काजूकतली


साहित्य:

१) काजू १ किलो
२) वेलची
३) साखर
४) चांदीचा वर्ख
५) पीठीसाखर

पूर्वतयारी:

१. एक किलो काजूची मिकसरमधून पूड करून घ्या.
२. साखरेचा एकतारी पाक करून घ्या .
३. त्यात ही काजूची व वेलची पूड घाला.

कृती:

१. वरील मिश्रण गॅसवर आटत ठेवावे.शिजवताना एकसारखे हलवत रहा.
२. मिश्रण घट्ट झाले की खाली उतरवून चांगले गोळा होईपर्यंत घोटा.
३. त्यात थोडी पिठीसाखर घाला. ताटाला तूपाचा हात लावून हे मिश्रण थापावे.
४. चांदीचा वर्ख लावावा. वडया पाडाव्यात.
५. या वडया खायला फारच रूचकर लागतात.
६. घरी स्वस्तात होऊन भरपूर होतात.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: