Tuesday, February 1, 2011

फळांचे असामान्य गुणधर्म, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख


मागच्या लेखात आपण फलाहाराचे महत्त्व पाहिले, आज आपण नेहमी उपलब्ध असणारी (त्या त्या ऋतुत व एरव्ही) फळे आपल्या आरोग्यासाठी किती अमूल्य गुणधर्मांचा खजिना बाळगून असतात याविषयी उहापोह करणार आहोत.

हल्ली बाजारात किवी, आवाकाडो यासारखी परदेशी फळेही मिळतात, परंतु आपल्या हवामानाप्रमाणे त्या त्या ऋतुत मिळणारी फळे ही सहज उपलब्ध होत असल्यामुळे आपण आपल्या नेहमीच्या ओळखीच्या फळांबाबत विचार करणार आहोत. बारमाही उपलब्धतेनुसार या सर्वांत वरचा नंबर लागतो तो केळे व पपईचा, तेव्हा त्यांच्यापासूनच सुरूवात करूया.

केळे - वर्षभर मिळणारे व सर्वांना सहज परवडणारे हे फळ मूळचे भारतातील किंवा असे म्हणू पूर्वेकडचे. आपल्या संस्कृतीत केळ्याचे झाड हे पवित्र मानतात. आपल्या लग्नासारख्या मंगल कार्यात व पूजेसाठी केळीचे खांब वापरण्याची पध्द्दत आहे. पिकलेली केळी ही अनेक आकाराची व पिवळी, हिरवी व लाल असतात. फळ एकच पण प्रत्येकाची चव वेगळी. आयुर्वेदानुसार ‘सफेद वेलची’ केळे हे चांगले मानतात. केळे हे फळ बिनबियांचे आहे. सालीच्या वेष्टनातून उपलब्ध असल्यामुळे जंतुसंसर्गाची शक्यता कमी, व कोणीही हाताळली तरी आतल्या फळाला संसर्ग होण्याचा प्रश्न उदभवत नाही. केळे हे उत्तम बलवर्धक आहे परंतु पचायला थोडे जड आहे हे लक्षात ठेवणे ईष्ट. केळ्यात पोषणमूल्ये बरीच आहेत. शरीराला उर्जा देण्याची शक्ती व स्नायूंना बळ देण्याची ताकद केळ्यांत आहे. जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने यांचे चांगले प्रमाण आहे. याची पोषणमूल्ये पाहू - आर्द्रता ७०.१%, (प्रति १०० ग्राम खाद्यभागात), प्रथिने १.२%, मेद ०.३%, खनिजे ०.८%, तंतुमय पदार्थ ०.४% व पिष्टमय पदार्थ २७.२%, कॅलशियम १० मिग्रॅ., फॉस्फरस ३६मिग्रॅ., लोह ०.९ मिग्रॅ., जीवनसत्व ‘क’ ७ मिग्रॅ. आयुर्वेदाच्या दृष्टीने पक्व केळे हे रस, रक्त, मांस व वीर्यवर्धक आहे. इतके असले तरी आयुर्वेद सांगते दूध व केळ्याचे शिकरण हे विरूध्द अन्न आहे, म्हणून नित्यसेवन करू नये.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: