Monday, January 31, 2011

-आणि पंतांचा लिहिता हात थांबला!, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

‘तोच मी’ या पुस्तकाची शेवटची पानं सुरू झाली. ‘नांदी’नं सुरू झालेलें पुस्तक ‘भरतवाक्य’ या प्रकरणानं संपणार होतं. हे संपणं जाणवणार होतं. एक निर्मिती आकार घेत होती. त्याची प्रकिया संपणार होती. उद्या सकाळी अकरा-साडे अकराला जायचं नाहीये या नं जाण्याची सवय करायला हवी. पण आज तर लिहायचं या विचारानं पंतांकडे पोहोचलो. नेहमीच्या जागेवर बसलो. पंतांची खासियत अशी की आदल्या दिवशीचे वाक्यही ते विचारायचे नाहीत, मी स्थिरस्थावर झालोय हे पाहून ते सुरू करायचे. ‘हां’ असं म्हणून त्यांनी सुरूवात केली. ‘प्रत्येकाच्या मनात एक असलेल्यांची यादी असते आणि दुसरी नसलेल्यांची. असलेल्या यादीपैकी बरीच मंडळी आपल्या डोळ्यादेखत नसलेल्यांच्या यादीत अलगद जाऊन बसतात. हळूहळू नसलेल्यांची यादी वाढू लागते आणि मग लक्षात येतं की आपणही त्या नसलेल्यांच्या यादीत जाऊन बसणार आहोत, अन् त्याचबरोबर आपलं असलेलंपणही संपून जाणार आहे. पण या संपून जाण्याची मला कधीच चिंता वाटली नाही. या संध्याछायांनी मला कधीच भिवविलं नाही. माझं आयुष्य मी जगलोय. कृतार्थपणे जगलोय.’ पंतांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. सुरूवात समाधानाची, त्यांची नजर मला परिचयाची झाली होती. त्यांचा ओध सुरू झाला. अधूनमधून आम्ही थोडी चर्चा करीत होतो. एखादा शब्द बदलत होतो. पण एक मुरब्बी प्रतिभावार लेखक त्याच्या स्वतंत्र शैलीत सांगत होता. मी लिहित होतो. कारण मला नाटकाच्या निर्मितीविषयीचा भाग नाटकाचं कथानक, नाटककाराशी चर्चा, नट नटयांचा शोध, त्याचे प्रयोग अशा घटनांच्या वर्णनातच सांगितला जायचा. निर्माता या नात्यानं ते त्यात रंगूनही जायचे. पण ‘भरतवाक्य’ या प्रकरणात त्यांच्यातला चिंतनशील लेखकच समोर आला. त्यातून अनेक सूरबध्द वाक्य आकाराला आली. नाटकाची रंगभूषा उरविल्यानंतर मी एक सामान्य माणूसच हे त्यांचं सांगणं होतं. ‘सामान्य माणसासारखं सामान्यात मिसळून जात असतानाच, माणूस न्याहाळण्याचं, माणूस वाचण्याचं माझं आवडतं कामंही मी करीत असतो.’ असं म्हणताना ‘पणशीकर’ असं म्हणून रस्त्यातला माणूस शेजारच्याला दाखवत असेल तर त्यांना त्यांचं सामान्यपण हिरावून घेतल्यासारखं वाटायचं, इतकं या असामान्य कर्तुत्वाच्या नटाची नाळ सामान्य माणसाशी जोडलेली होती. हे सारं भरतवाक्य एकीकडे एखाद्या सुरेख स्वमतासारखं आहे.


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: