Monday, January 31, 2011

सातवी वास्तू - घरातील वस्तू गायब आणि थांगपत्ता केवळ वास्तूला भाग-१, प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ, रविराज अहिरराव यांचा लेख


आधीच्या घरची व्हिजीट करता करता बराच वेळ झालेला. तेव्हा रात्री दहा वाजता मी या माझ्या शेवटच्या क्लायंटकडे व्हिजीटसाठी त्यांच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर दोन मिनिटांनीच एक्सपर्टला त्याच्या घरून फोन आला काम अर्जंट असल्यामुळे एक्सपर्टला घरी जावे लागले.त्यामुळे त्यांच्या घरी मी एकटीच होते. घर तसे छोटेसेच होते. वन बी एच के चे घरात मिस्टर व मिसेस दोघेच दिसत होते. काम सुरू करण्यापूर्वी लगेच त्यांच्या घराचा राऊंड घेऊन एकंदरीत दिशेचा अंदाज घेतला. घराचा मुख्य दरवाजा नैऋत्येचा. देवघर नैऋत्येत तसेच लीफ्टचा डक्टही येत होता. पश्चिमेला बेडरूम वायव्य दिशेला किचन तसेच ईशान्येला टॉयलेट बाथरूम आग्नेय दिशेला कट व दक्षिण दिशेला त्यांचे लिव्हींग रूम येत होते. घराच्या दिशा बघूनच प्रकार काय असेल हे लक्षात आले होते.

व्यवसायाने मिस्टर एका मोठया कंपनीत लीगल ऍडव्हायझर होते तर मिसेस बॅंकेत सर्व्हिसला होती. घराचा नकाशा बनवता बनवता मी त्यांचे प्रॉब्लेम सांगायला सुरूवात केली. त्यांना म्हटले पैसा येतोच पण टिकत नाही, कुठल्याही कामात यश लवकर मिळत नाही. किचनमध्ये कामाला उत्साह वाटत नाही. आरोग्याच्या तक्रारी आहेतच. पूजा करताना पूजेत लक्ष लागत नाही व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या दोघात सुसंवाद नाही. पारदर्शीपणा नाही.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: