Thursday, January 27, 2011

बाकरवडी


साहित्य:

१) डाळीचं पीठ ३ वाटया
२) हळद पाव चमचा
३) मीठ
४) कच्चं तेल २ चमचे
५) मैदा १ वाटी
६) तिखट १ चमचा
७) हिंग पाव चमचा



सारण:

१) खसखस पाव वाटी
२) सुकं खोबर १ वाटी
३) कोथिंबीर १ जुडी
४) मीठ
५) काळा मसाला
६) तीळ पाव वाटी
७) हिरवं वाटण २ चमचे
८) पिठीसाखर १ चमचा
९) कांदा-लसूण मसाला
५) काळा मसाला

पूर्वतयारी:

१. वरील सर्व साहित्य एकत्र करून घट्ट मळावं.
२. खोबरं भाजून कोरडचं हातानं कुस्करावं. तीळ खसखस भाजून घ्यावी.
३. कोथिंबीर बारीक चिरावी, हिरवं वाटण थोडया तेलात परतावं. हे एकत्र केल्यावर सारण तयार होईल.

कृती:

१. पोळी लाटून त्यात मोठा चमचाभर तेल घेवून त्यात कांदा-लसूण मसाला मिसळून त्या मिश्रणाचा पोळीवर पातळ थर द्यावा.
२. नंतर त्यावर आधी तयार केलेलं सारण पसरून त्याची गुंडाळी करावी.
३. चाळणीला आतून तेल लावून गुंडाळ्या ठेवाव्या. (मध्ये अंतर सोडावं.)
४. उकडून गार झाल्यावर दाबून वडया कापाव्या.
५. तेलात तळून घ्याव्या. (हवं असल्यास फ्रीजमध्ये ठेवून नंतर तळाव्या.)

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: