
जन्मताच मृत्यूपर्यंत स्टेशन ब्रेक जर्नीसह देण्यात येते. जीवन म्हणजे ब्रेक जर्नी होय. किंवा असे ही म्हणता येईल की ईश्वर आपल्याला रिटर्न तिकीट देऊनच जन्माला घालतो. म्हणून जी गोष्ट अटळ आहे त्याबाबत शोक वा भय ठेवू नये व मृत्यूपूर्वीच जीवन कृतार्थ करण्याची कल्पना लोकांचे मनात सुध्दा येत नाही. म्हणूनच समर्थ उपदेश करतात की,
मरणाचे स्मरण असावे । हरियलिस सादर व्हावे।
मरोन कीर्तीस उरवावे । येणे प्रकारे॥
या ठिकाणी समर्थ मृत्यूच्या भितीत जीवन जगण्यास सांगत नसून मृत्यूचे स्मरण ठेवून शरीर आहे तोपर्यंत त्याचेकडून वसूली करण्याचा आग्रह धरीत आहे. मृत्यू ही अपरिहार्य व अनिवार्य गोष्ट असून संपत्ती, पराक्रम, शूरता, सत्ता, पदवी, विद्वत्ता, उत्तम आरोग्य, चांगले पहाणे, पाठीमागे शक्तीशाली नातेवाईकांची फौज, मित्रमंडळी या सर्व गोष्टी मृत्यूला टाळू शकत नाहीत. मृत्यूदेवता अत्यंत धर्मनिष्ठ, काटेकोर व बिना भेदभाव आपले कर्तव्य चोख बजावते.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment