Saturday, January 29, 2011

नारळी भात


साहित्य:

१) तांदूळ २ भांडी
२) गूळ ३ भांडी
३) तूप ४ टे.स्पू.
४) लवंगा ३-४
५) वेलदोडे ५-६
६) नारळ १

पूर्वतयारी:

१. भात करण्यापूर्वी जुने आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवावेत.

कृती:

१. खवलेला नारळ व पिवळाधमक चिरलेला गूळ मिसळून घ्यावा व भातात घालावा.
२. पातेल्याच्या बुडाला १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात भात गूळ व नारळ घालावे.
३. पातेल्याखाली तवा ठेवून मंद गॅसवर अधून मधून हलक्या हाताने ढवळून २-३ वाफा घ्याव्यात.
४. वेलदोडा पूड घालावी व १ चमचा तूप सोडून गॅस बंद करून झाकून ठेवावे.

टीप:

१. नारळीभात नारळीपोर्णिमेला करायची पध्द्त आहे. नारळाचा चव भाताच्या बरोबरीने असला की भात चवीला छान लागतो.
२. भात मऊसर शिजवावा. नारळीभात मऊसर व्हावा. फार फडफडीत मोकळा चांगला लागत नाही.
३. भात गरम वाढावा व वर साजूक तूप घालावे.
४. गूळ खूप काळा अथवा खारट वापरू नये. भात रंगाने काळपट दिसला तर चवीला चांगला होऊन सुध्दा खूप लोकांना आवडत नाही.
५. भरपूर गोड होण्याकरता गुळाबरोबर अर्धी वाटी साखर घालायला हरकत नाही.
६. आदल्या दिवशी केला व दुस-या दिवशी गरम केला तरी चालतो.

वरील साहित्यात केलेला नारळीभात ४-५ माणसांना भरपूर होतो.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: