इंजिनियर, पत्रकार, न्यायमूर्ती, शिक्षक...इतरही विविध पेशातली मंडळी आणि डॉक्टर! या मंडळींवर हल्ली समाज पूर्ण विश्वास टाकतो असं वाटत नाही.
या विविध पेशांमधला प्रत्येक माणूस काही अप्रामाणिक नसतो.पण अप्रामाणिकपणाचं प्रमाण सध्या एवढं वाढत चाललंय, त्यामुळे ते आज ताकच फुंकून पितायत. उद्या ते पाणीसुध्दा फुंकून पितील.
खरं तर ही यादी मी कितीही वाढवू शकेन. पण इथेच थांबतो... पण आणखीन एकच गोष्ट सांगतो. कारण त्या मुद्यावर मला लिहायचंय. भारतीय वंशाच्या पुरूषाने परदेशात जाऊन केलेली सुंदर गोरी बाई मी पाहिली आहे. गोरी म्हणजे साहेबी गोरी! कोकणस्थ गोरी नाही. अर्थात मी सिलेब्रटिव्हंबद्दल बोलत नाही. नाहीतर तुम्ही मला लगेच जेमिमा इम्राम खानचं उदाहरण द्याल. मी सर्वसामान्य माणसाबद्दल बोलतोय. तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळा अनुभव आला तर मला लेगच सांगा.
मला तर असं नेहमी वाटतं की सेकण्डसचा माल आपल्या गळयात हे गोरे नेहमी बांधतात आणि आपण तो बांधून घेतो. कारण इंपोर्टेड गोष्टीबद्दल आपल्याला भयंकर आकर्षण आहे.
आणि एक गोष्ट आहे. आपण गो-या साहेबापेक्षा जास्त वर्णद्वेषी आहोत. गो-यांपेक्षा आपण काळ्या रंगाचा जास्त द्वेष करतो. आपल्याला बायको गोरी लागते. होय, त्यात वावगं काही नाही. गोरेपणात दोष लपवायची जादू आहे. गोरेपण चपटं किंवा अपरं नाक, जाड ओठ, थोराडपणा अगदी काहीही लपवू शकतं.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment