Tuesday, March 22, 2011

आढावा - आहार संबंधीत विकारांचा, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख

अशी यादीच करायची तर बरीच पाने कमी पडतील. सांगण्याचा उद्देश इतकाच की आपल्याला लहानपणापासून खाण्याच्या काही सवयी लागलेल्या असतात. त्यातही आवड निवड असते. बरे प्रत्येक घरा-घरात, जातीजातीत जेवण बनवण्याची, व मसाले वा तत्सम अन्नपदार्थ वापरण्याची पध्दत वेगवेगळी असते. चवीतही खूप फरक पडतो. या सर्वांवर मात करून एक सर्वसाधारण (standard) आहार पध्दती अवलंबणे हे काही आहारशास्त्राचे काम नाही. परंतु निदान आपल्याला लागण झालेल्या विकाराचे मूळ आपल्या आहारात आहे हे समजून त्यानुसार त्यात आपल्या चवीनुसार योग्य बदल करणे हेच खरे कौशल्य आहे. आहार बदलाने विकार झाल्यावर तो विकार बरा करणे या पेक्षा आधीपासूनच काळजी घेऊन तो टाळला कसा जाईल याचा आहाराच्या माध्यमातून साकल्याने विचार झाला तर, बरेचसे विकार जे आता तरूण वयातही डोके वर काढू लागले आहेत. त्यांचा योग्य प्रकारे प्रतिबंध करता येईल. आहारशास्त्र आणि चव यांची योग्य सांगड घातली तर निरोगी व कार्यक्षम आयुष्य जगण्याचे समाधान लाभू शकेल यात वाद नाही.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

1 comment:

banjibabka said...

The best slots sites - DrmCD
Check the best slots sites 2021 | Find the best casino 제주도 출장샵 bonus The 진주 출장마사지 biggest casino bonus offers include no deposit spins, 안동 출장마사지 free spins, bonus games, Are casino 양산 출장샵 bonuses good for free?What are the best 경산 출장마사지 slots sites?