Wednesday, March 9, 2011

राजाराम बापूंचे श्रीराम जयराम, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेखC

श्रीयुत राजाराम बापूंची मैफल आज छानच रंगली होती. गेल्या अर्ध्या तासात बापूंनी एकही सिगारेट ओढली नव्हती. दिवसाला किमान चाळीस सिगारेट जाळणा-या बापूंचा आजचा अवतार फार निराळा होता. गेली कित्येक वर्षे बापू आणि त्यांच्या हातात सिगारेट हेच दृष्य आमच्या परिचयाचे होते. कधी कधी ते पेटया सिगारेटनेच नवीन सिगारेट पेटवत असत. बापूंच्या केबीनच्या सर्व भिंती केवळ सिगारेटमुळे पिवळ्या पडल्या आहेत. आज बापू केवळ सिगारेट सोडणे या विषयावरच बोलत होते. बापू एकदा मित्राबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे भिंतीवरचे पोस्टर त्यांनी वाचले. आणि त्यांचे हृदयपरिवर्तन झाले. एका झटक्यात सिगारेट सोडून दिली. गेला दीड महिना त्यांनी सिगारेट ओढली नाही आणि त्यांना कोणी सिगारेट ओढताना पाहिले पण नाही. सध्या ‘तंबाखूचे दुष्परिणाम आणि सिगारेट, तंबाखू, गुटका कसा सोडायचा’ या एकाच कार्याला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. गेल्या काही दिवसात सार्वजनिक ठिकाणी बापू जातात आणि स्वत:च्या अनुभवावरून इतर तरूणांना समजावण्याचा प्रयत्न करतात. या कार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत असताना त्यांच्या प्रकृतीवर थोडाफार परिणाम होतच आहे. पूर्वी हेच बापू ‘दिवसाला रूपये २००/- जाळत होते,’ असे कोणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. पूर्वी सिगारेट नसेल तर जळलेल्या सिगारेटची थोटकेपण त्यांनी ओढली आहेत. बसमध्ये सिगारेट ओढता येत नाही या एकाच कारणास्तव त्यांनी बसचा प्रवास टाळला होता. 

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: