पं. भीमसेन जोशी पुणे विद्यापीठात ‘मारवा’ गात असतानाच पुण्यात अवघ्या गानवेडया-नाटयवेडया रसिकांना खॉंसाहेब वसंतखाँ देशपांडे यांच्या दु:खद निधनाची बातमी समजली. त्यानंतर जी शोकसभा झाली त्यात पु.ल. देशपांडे जे म्हणाले त्याची आज आठवण होते. वसंतरावांच्या नसण्याचा उल्लेख करून पु.ल. म्हणाले की, ‘वसंता नाही अशा जगात आपल्याला जगायला लागेल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.’ याच शब्दात फक्त थोडा नावाचा बदल करून पंतांशिवाय आपल्याला त्यांच्या शब्दांचं बोट धरून चालावं लागेल आणि ते नसताना त्यांचे लेख संपादित करून त्याचे भाग करून पाठवावे लागतील अशी कल्पनाही केलेली नव्हती. काळाच्या-नियतीच्या पावलांचा आवाज आपण ऐकू शकत नाही. नियती आपलं काम करून पुढे निघून गेली की, घडलेल्या घटीताच आपण फक्त साक्षीदार असतो. मग तो काळ ती अप्रिय, दु:खद घटना आपल्यापासून दूर दूर नेतो. आपल्याला त्या नसण्याची सवय करून देतो. आपला प्रवास पुढे चालत राहतो. पंतांना जाऊन महिना-सव्वा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय. कामं चालू आहेत, चालू रहाणार आहेत. मुख्य खंदा फलंदाज बाद झाल्यावर एखाद्या नाइट वॉचमनवर फलंदाजी करून खेळपट्टीवर टिकून आहे. टिकणार आहे!
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment