Monday, March 14, 2011

देवाचं अस्तित्व भाग - २, माझी लेखनगिरी, जेष्ठ क्रीडा-सिने-ललित पत्रकार, द्वारकानाथ संझगिरी यांचा

नास्तिक किंवा निरीश्वरवादी होणे शक्य आहे का?

सामान्य माणसाला फार फार कठीण वाटू शकतं. धर्माचा आणि परमेश्वराचा पीळ तुटता तुटत नाही. आज आपल्या देशात असम चित्र दिसतंय की, हा पीळ वाढायला लागलाय. साम्यवादी राष्ट्रांनी धर्म आणि देव गाडण्याचा आटोकाट करण्याचा प्रयत्न केला; पण तरीही ती राष्ट्रे लोकांच्या मनातला देव उखडून टाकू शकली नाहीत.

दुस-या महायुध्दाच्या काळात स्टॅलीनला रशियामधल्या चर्चचे दरावजे उघडावे लागले. तिथलं आजचं चित्र काय आहे? लेनिनचे पुतळे कोसळले आहेत. साम्यवाद गाडला गेलाय. देव आणि धर्म शिल्लक आहे. कुहे अल्ला आहे, कुठे येशू आहे. एवढाच तो फरक आहे.

आपले पंडीत नेहरू एवढे पुरोगामी. पण त्याची रक्षा त्याच्याच आग्रहाखातर गंगेत सोडण्यार आली. डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मावर केवढा कडवट हल्ला चढवला, पण त्यांची पहिली बायको वारल्यावर त्यांनी सर्व कर्मकांड हिंदू धर्माप्रमाणेच केले होते. एखादा विनायक दामोदर सावरकर असतोजो बुध्दी प्रामाण्यवादावर शेवटपर्यंत चिकटून राहतो. ही मोठया माणसाची त-हा, तर सामान्य माणूस एका रात्रीत थोदाच बुध्दीप्रामाण्यवादी होणार!

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: