Saturday, March 19, 2011

देवाचं अस्तित्व भाग - ३, माझी लेखनगिरी, जेष्ठ क्रीडा-सिने-ललित पत्रकार, द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख

(देवाचं अस्तित्व या लेखाचा हा उर्वरित भाग)


अंधश्रध्दा आपल्याकडेच आहे असं नाही, ती जगभर आहे. पुढारलेल्या युरोपात आहे. एक छोटं उदाहरण देतो. कॅथलिकनन्स कपडे घालूनच आंघोळ करतात. कारण त्यांची श्रध्दा आहे की देव त्यांच्याकडे पाहत असतो.

(आपल्या कृष्णासारखे खटयाळ देव तिथे सुध्दा आहेत तर...) त्यावर पूर्वी कुणीतरी प्रश्न विचारला होता, "दरवाजा बंद असताना देव कसा बघणार?" त्याला उत्तर असं देण्यात आलं होतं, "दरवाजा बंद असला म्हणून काय झालं, देवाची दृष्टी भिंतीच्या आरपार जाऊ शकते." पण मग ते असा विचार का करत नाहीत, की जर देवाला खटयाळपण करायचा असेल तर जी दृष्टी दगड-विटांच्या पलिकडे जाऊ शकते ती तलम कपडयापार जाणार नाही का? याला अंधश्रध्दा म्हणतात. ती विज्ञानात प्रगती केलेल्या युगात आहे, तर भारतात अवस्था काय असायला हवी? इथे तर सुशिक्षित माणूसही विश्वास ठेवतो की, सापाचं विष मंत्राने उतरवता येतं. इथे भक्ती देवापुरती मर्यादित राहत नाही. मग इथल्या मंडळींना देवापर्यंत पोचवणारा दूत लागतो. दूत आला की मठ येतो आणि एकदा अंधश्रध्देची पट्टी डोळ्यांवर गच्च बांधली गेली की चिक्कार साधूसंत आपलं उखळ पांढरं करून घेतात.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर



No comments: