"मॅणेजरसाहेब , केवढी लांबुडकी खोली ही? आन् ह्या लांबच्या लांब गुबगुबीत गाद्या. मस्त ताणून देतो बघा रातच्याला."
"कोंडीबा हा व्हरांडा आहे, खोली नव्हे."
"काय ही खोली नव्हं तर मग ह्या गाद्या कशापायी?"
"अहो, हा गालीचा आहे. चला खोलीत जाऊया," दरवाजा उघडीत वागळे म्हणाले. "ही तुमची खोली, रहा इथं निवांत."
"अरारारा ss काय झ्यॉक हाय हो, गाद्या बी काय जाडजूड हाईती," कोंडीबा हरकून जात म्हणाला. "मॅनेजरसाहेब शंभर रूपये भाडं असणार बघा ह्या खोलीला. कमळी लई खुष झाली असती बघा." "चार हजार रूपये भाडं आहे ह्या खोलीला, टॅक्सेस एक्स्ट्रा."
"अबबब...! चार हजार!! अवो पन आपून तर एक दिस राहणार. महिन्याचं भाडं कशापायी भरायचे म्हणतो मी?"
"एका दिवसाचे चार हजार, शिवाय कर वेगळे."
"काय?...काय, सांगतासा काय?...मला तर चक्कर येऊन राहिली बघा," कोंडीबा म्हणाला. "नगं मॅणेजरसाहेब, इथं मला झोप नाही यायची. मी आपला बाहीर व्हरांडयात पडतो कसा. अवो आमच्या गल्लीतली माणसं एवढया पैशात चार महिने काढत्यात. नको, ह्या पैशाचं काटं मला टोचतील. नाही झोप येणार मला."
"अहो मोठया साहेबांचे तसे आदेश आहेत. तुमची बडदास्त एखाद्या मोठया अधिका-याप्रमाणे ठेवायचे खुद्द चेअरमनसाहेबांचे आदेश आहेत. अहो तुम्ही एका माणसाचा जीव वाचवून कंपनीचं फार मोठं काम केलंय आणि त्या मानाने हे जे कंपनी देऊ करतेय हे फार छोटं आहे."
"पर आमास्नी सवय नाय हो s आमी चार माणसात मुटकूळी करून पडणारी गडी मांणसं. आम्हास्नी..."
"महापुरात उडी मारणारे तुम्ही महागडया खोलीत एकटं राहायला घाबरता की काय?" वागळे प्रश्नाचा होरा बदलीत म्हणाले.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments:
Post a Comment