Thursday, February 10, 2011

मूगाचा हलवा

साहित्य:
१) मूगडाळ ५०० ग्रॅम
२) वेलदोडे ४
३) साखर ५०० ग्रॅम
४) दूध ६ कप
५) तूप २ कप
६) मावा
७) केशर
८) काजू १०० ग्रॅम

पूर्वतयारी:
१. (हिरवी) मूगाची डाळ एक रात्र भिजत घालावी.
२. मग सकाळी मिक्सरमध्ये वाटावी.

कृती:
१. वाटून झाल्यावर कढईत तूप गरम करून त्यात वाटलेली डाळ टाकून मंद विस्तवावर सोनेरी रंगावर भाजावी.
२. मग त्यात दूध टाकावे. दूध टाकल्यावर साखर टाकावी.
३. मावा टाकून सतत परतत राहावे. अगदी तूप सुटेपर्यंत परतावे.
४. मग केशर आणि वेलची पावडर घालावी.
५. मग काजू घालून खायला द्यावे.


अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद













No comments: