Monday, February 14, 2011

राशी-भविष्य

मेष
आजपासून महिनाभर रवि आपल्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. समाजातील मोठ्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंशी ओळखी होतील. त्यापासून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. अडिअडचणीच्या वेळी वडिलधा-या लोकांकडून मदत मिळेल. आज आपल्या मनाप्रमाणे घटना घडतील.

वृषभ
आजपासून महिनाभर रवि आपल्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात सरकारी नोकरीत उच्च पद मिळवू इच्छिणा-यांनी प्रयत्न केल्यास यश मिळेल. सुरूवातीला आर्थिक स्थिती खालावलेली वाटत असली तरी हळूहळू आर्थिक आवक वाढेल. संगीताच्या क्षेत्रात नाव मिळवू इच्छिणा-यांना चांगली संधी येईल. आज पाहुण्यांचे आगमन होईल.

मिथुन
आजपासून महिनाभर रवि आपल्या नवम स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात राजकरणी लोकांना यश मिळेल. त्यांना हव ते साध्य करता येईल. उद्योगधंद्याकडे थोडे दुर्लक्ष होईल. सामाजिक कार्ये हाती घ्याल. मानसन्मान होईल. आज स्वतःसाठी वेळ काढाल.

कर्क
आजपासून महिनाभर रवि आपल्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात त्रास घेऊन पैसा मिळवावा लागेल. पैशाची कमतरता वाटॆल. एकदम खर्च किंवा नुकसान, पैशाचा संग्रह होणार नाही. परंतु आर्थिक स्थिती खालावणार नाही. आज खर्चाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या.

सिंह
आजपासून महिनाभर रवि आपल्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे. विवाहेच्छुकांना प्रतिष्ठीत घराण्यातील, सुस्वभावी आणि सुसंस्कृत जोडीदार मिळेल. स्वतंत्र धंद्याची आवड असणा-यांना पोषक महिना आहे. धंद्यात चढ-उतार होत राहतील स्थैर्यता लाभणार नाही. आज मित्रपरिवाराचा सहवास लाभेल.

कन्या
आजपासून महिनाभर रवि आपल्या षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात व्यवसाय उद्योगात असणा-यांना नवीन नोकरदार वर्गाची गरज असल्यास चांगले कामगार मिळतील. नीट पारख करुन व्यक्ती निवडावी लागेल. इतरांवर विसंबून राहता कामा नये. रक्तदाब, मणक्याचे आजार असणा-यांनी पथ्य पाळा. आज कामाला गती प्राप्त होईल.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: