ज्यांनी शेअर्समध्ये स्वतःच गुंतवणूक केलेली असते, त्यांना आपल्या शेअर्सच्या किंमतींवर लक्ष ठेवून राहावेच लागते. बाजार जेव्हा हळूहळू पण सतत वरवर जात असतो, तेव्हा गुंतवणूकदाराला 'घ्या आणि ठेवून द्या' या तत्त्वाचा वापर करून जास्त फायदा होतो. 'शेअर्स हे विकलेच पाहिजेत त्याशिवाय फायदा कसा होणार' हे विधान अगदी योग्य आहे.
पण जर का बाजार अजून काही दिवस वर जाण्याची चिन्हे दिसत असतील किंवा बाजार पडण्यासाठी कोणतेही ठोस कारण दिसत नसेल तर मात्र या काळात आपल्या शेअर्सचा भाव पाहिला तर भावात झालेल्या या वाढीमुळे सदर शेअर्स विकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी अशा तेजीच्या दिवसात बाजाराकडे दुर्लक्ष करणे कधीही चांगलेच व आर्थिकदृष्टयाही फायदेशीरच ठरते. परंतु सध्या ज्या प्रकारे बाजार रोज 200 ते 500 अंकांनी कोसळतोय तेव्हा एकतर या घसरणीचा फायदा ट्रेडींग करून उचललाच पाहिजे.
ब-याचदा गुंतवणूकदार हा नोकरी-व्यवसाय करणारा असेल तर त्याला रोजच्या कामांमध्ये बाजारावर किंवा आपल्या शेअर्सच्या भावांवर लक्ष ठेवता येणे कठीण असते. अशा वेळी मात्र आपल्या गुंतवणूकीला संरक्षण देण्याचे छोटेसे पण उत्कृष्ट हत्यार म्हणजे स्टॉप-लॉस. हे आपल्या ब्रोकरकडून आपल्याला ऑनलाईन ट्रेडींग करण्यासाठी दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये असते. पण ट्रेडर मात्र याचा फायदा घेताना दिसत नाहीत. खरे तर आपल्याला हा एक मोफत विमाच असतो कारण या सोयीसाठी सर्वसामान्य ब्रोकरेज व्यतिरीक्त कोणतेही मूल्य हा ब्रोकर आपल्याकडून घेत नाही.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment