साहित्य:
१) ओले बोंबिल ६ ते ८
२) कांदे ५ मध्यम
३) आले ४ इंच
४) तेल
५) हिरव्या मिरच्या ४-५ मध्यम
६) नारळ अर्धी कवड
७)लसूण पाकळ्या ८-१०
८ काळे मिरे ८-१०
९) चिंच
पूर्वतयारी:
१. बोंबिल प्रथम स्वच्छ धूवून घ्यावेत.
२. माश्याला एक चमचा हळद, २चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला व १ चमचा मीठ चांगले चोळून लावावेत.
३. रात्री किंवा ४-५ तास चिंच भिजवून ठेवावी आणि चांगल्या भिजलेल्या चिंचेचा कोळ करावा.
४. तो चिंचेचा कोळदेखील बोंबलांना लावून ते अर्धा तास मुरू द्यावे.
५. साडे चार कांदे मध्यम चिरून घ्यावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत.
६. आल्याचेही बारीक तुकडे करावेत. लसूण ठेचून घ्यावी.
७. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
८. नारळाची अर्धी कवड खवून घ्यावी.
९. खवलेला नारळ, अर्धा कांदा व काळे मिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कृती:
१. साधारण ६-७ चमचे तेल एका जाडा तळाच्या शक्यतो उथळ पातेल्यात चांगले तापवून घ्या. यात चिमुटभर हिंग घाला.
२. ते फुलले की त्यात ठेचलेली लसूण व आल्याचे तुकडे घाला. चांगले खरपूस तळसावून घ्या.
३. आता चिरलेल्या मिरच्या व कांदे घाला, चांगले तळसून घ्या.
४. बोंबलामध्ये वाटलेले मिश्रण वरील फोडणीमध्ये मिसळा.
५. बोंबलाला आपण मीठ लावलेले असते, वाटल्यास आवश्यकतेनुसार आणखी मीठ घाला.
६. गॅस मध्यम आचेवर ठेवा. एक उकळी आली की बंद करून टाका.
टीप:
१. एकदा मिश्रण गॅसवर उकळायला घातले की जास्त ढवळू नये.
२. हे मिश्रण जाडसर असावे, त्यात जास्त पाणी घालू नये. बोंबिल माशाला पाणी सुटते त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन पाणी घालावे.
३. आपल्या आवश्यकतेनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
४. झणझणीत असे हे भुजणे भाकरी वा भाताबरोबर खावे.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment