Saturday, February 5, 2011

बोला, मराठीत बोला!, माझी लेखनगिरी, जेष्ठ क्रीडा-सिने-ललित पत्रकार, द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख


‘मराठी असे आमुची मायबोली’ लेखाचा हा उत्तरार्ध)

मराठी माणसांना तुम्ही आज सांगितलंत की मुलांना इंग्रजी माध्यमात घालू नका तर तुमचं कोणी ऐकणार नाही.
इंग्रजी माध्यम म्हणजे भरभराट!
इंग्रजी माध्यम म्हणजे अमेरिकेला जायचा सोपा मार्ग!
फाड फाड इंग्रजी बोलता येणं म्हणजे हमखास नोकरी! वगैरे गोष्टी मराठी माणसाच्या इतक्या पक्क्या मनात बसल्या आहेत की त्यांचं मतपरिवर्तन अशक्य आहे.
तुम्ही त्यांना लाख समजावून सांगा की मराठी माध्यमात शिकलेली मुलं अमेरिकेत गेली नाहीत का? त्यांनी नाव लौकीक कमावला नाही का? त्यांना पैसा मिळाला नाही का?

या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो असलं तरी त्यांना पटण्यासारखं नाही. ठिक आहे. जाऊ देत मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला पण त्यांना निदान घरी मराठीची गोडी लागेल एवढी तरी गोष्ट करता येईल? मातृभाषा ही कुठल्याही भाषेपेक्षा मुलांना लवकर शिकता येते. ती निदान घरी तरी शिकवा. हे लिहिताना मला लाज वाटते. पण अशी कित्येक मराठी घरं आहेत जिथे मुलांची घरी बोलण्याची भाषाही इंग्रजी आहे. मुलं इंग्रजीत बोलतात. बापही बोलतात. प्रधानाने साठेशी, साठेने संझगिरीशी, संझगिरीने राऊतशी इंग्रजीत बोलायची गरज आहे का? इंग्रजी माध्यमात शिकलेले असले तरी इंग्रजीत बोलायची गरज नाही. पण प्रधान इंग्रजीत बोलला की साठेला वाटतं की आपण इंग्रजीत बोललो नाही तर आपल्याला इंग्रजी येत नाही असा समज प्रधानाचा होईल. ते त्याला कमीपणचं वाटतं. मग तो आपला रूबाब दाखवतो.

इंग्रजीची एवढी धुणी धुवायची गरज आहे का? भाषा जाऊ देत. मराठी घरातलं खाणंपिणंही बदललंय. बटाटे-पोह्यांची जागा हॅम्बरगरने घेतलीय. शिरा आऊटडेट झालाय.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: