Friday, January 28, 2011

डायरी एका पालकाची विवाह समुपदेशक मंगला मराठे यांचा लेख


नेहा आणि निखिलची डायरी वाचल्यावर एका पालकाने त्यांचा एक अनुभव आणि त्यावेळी त्यांच्या मनात उभे राहिलेले प्रश्न आम्हाला पाठविले. थोडक्यात त्यांच्या डायरीचे त्या दिवशीचे पान पाठविले.
आम्ही आमच्या मुलीचे-स्नेहाचे नाव एका वधूवर मेळाव्यासाठी नोंदविले होते. उद्देश हा की तिचा जोडीदार तिने बघून बोलून निवडावा. तिला जास्त चॉइस मिळावा.

मेळाव्याला गेल्यावर मात्र पार निराशा झाली. मेळाव्याला अडीजशेच्या वर नोंदणी झाली होती. हॉल भरलेला होता. पण त्यात तरूणाई कुठे दिसत नव्हती. तरूण मुलामुलींची संख्या दोन आकड्यात काही जात नव्हती. मन म्हणाले हा वधूवर मेळावा आहे की पालक सभा?

कार्यक्रमाचे स्वरूप असे होते. –
आयोजकांनी मंचावरून एकेका फॉर्ममधली माहिती वाचून दाखवली. खरे म्हणजे फॉर्ममधे वय, ऊंची, शिक्षण, पगार याबरोबर तुमचे छंद, आवडी, खास गुण, खोडी, घरातल्या व्यक्तींबद्दल माहिती, जोडीदारबद्दल अपेक्षा असे रकाने होते. पण ते कोणी फारसे भरलेले नव्हते. ज्यांनी भरले होते त्यांनी ते अगदीच वरवर भरले होते. म्हणजे अनुरूप, मनमिळाऊ, निर्व्यसनी असे. फॉर्म भरण्याचे काम पूर्ण केले होते इतकेच. आयोजकांनी प्रत्येक मुलाची मुलीची वय, ऊंची, शिक्षण, जात, रास, गोत्र वाचून दाखवले. जमलेल्या पालकांनी आपल्या मुलांना ‘शोभेल’ अशी स्थळे लिहून घेतली. जी मोजकी मुले आली होती त्यांनी पुढे येऊन स्वत:ची ओळख करून दिली. पण त्यांनीही अशीच वरवरची माहिती सांगितली. पालकांनी ती लिहून घेतली. नोंदणी झालेली बहुतेक स्थळे सुशिक्षित, सुस्थित होती. त्यातली अनेक मुले उच्चशिक्षित होती. मनात सहज एक विचार डोकावला
‘जनरेशन गॅप! जनरेशन गॅप! म्हणून आरडाओरडा करतात. इकडे बघा कुठे आहे जनरेशन गॅप? दोघांची पद्धत सेम टु सेम आहे.’

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: