Monday, March 21, 2011

घटस्फोटाच्या विळख्यात भाग-३, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख

घरकामाची सवय नसते


आम्ही मुलगा मुलगी असा भेद करीत नाही म्हणताना पालक मुलींना काही वयापर्यंत मुलांसारखे वागवतात. सगळ्या गोष्टी हातात तयार देतात. घरातही काहीही काम त्यांना सांगत नाहीत. लग्न झाले की मात्र एकदम तिच्यात गृहिणीपणा यावा अशी अपेक्षा केली जाते. पण तसे होत नाही. लग्नानंतर पहिल्यासारखे बिनधास्त राहता येत नाही. विशेष करून एकत्र कुटुंबात लग्नानंतर येणारी बंधने, जबाबदा-या मुलींना जाचक वाटतात. त्याचे पडसाद पती-पत्नीच्या नात्यात उमटतात. विभक्त राहणा-या नवीन जोडप्याला सुध्दा हा त्रास होतो. आणखी एक गोष्ट-वरवर दिसायला हा अगदी फालतू मुद्दा वाटेल. पण प्रश्नाच्या मुळाशी हात घालणारी आहे. दोघांनाही घरकामाची स्वयंपाकाची सवय नसेल तर घर मॅनेज होत नाही. स्वयंपाक जमून आला की जेवणाचे समाधान मिळत नाही. त्यामुळे जीवाची चिडचिड होते. ब-याच विसंवादांना इथूनच सुरूवात झालेली दिसते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: