Monday, March 21, 2011

तेलपोळी

साहित्य:


१) हरभरा डाळ        अर्धा किलो
२) साखर                 अर्धा किलो
३) जायफळ पूड      एक चमचा
४) नारळाचं दूध      अडीच वाट्या
५) वेलची पूड         एक चमचा

६) मीठ                  अर्धा चमचा

पोळीसाठी साहित्य :
१. चार वाट्या मैदा, पाव चमचा मीठ, दोन वाट्या दूध, तेल.

पूर्वतयारी:

१. मैद्यात मीठ टाकून दुधात सैलसर भिजवा.
२. तेल, पाणी लावून कुटावं. पातेल्यात भरपूर तेल टाकून पिठाचा गोळा ठेवावा.
३. पुरणपोळीप्रमाणे साखर घालून पुरण शिजवावं त्यात जायफळ, वेलचीची पावडर टाकून पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.
४. मैद्याच्या पिठाचे गोळे करावे. मैद्याच्या दुप्पट पुरण घेऊन त्याचे गोळे करावे.
५. मैद्याच्या गोळ्यात पुरण भरून घ्यावं.

कृती:
१. बटरपेपरला किंवा पोळपाटाला तेल लावून त्यावर पातळ पोळी लाटावी. लाटताना पोळी उलटू नये.
२. लाटून झाल्यावर पोळी हळूहळू लाटण्यावर घेऊन तव्यावर टाकावी. तवा उलटा ठेवून पोळी भाजायला टाकल्यास पोळी आपोआप लांबते, पातळ होते. तेलपोळी बदामी रंगावर भाजावी.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद







No comments: