Monday, March 21, 2011

फूले अश्रूंची अन् आठवणींची, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

१४ मार्च प्रभाकर पणशीकरांचा वाढदिवस. त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा कसा साजरा करायचा याची आखणी कुटुंबीयांच्या, त्यांच्या मित्रांच्या, जवळच्या संबंधितांच्या मनात सतत चालू होती. कल्पना मांडल्या जात होत्या. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी समिती आकाराला येऊ घातली होती. पण या सर्व मांडणीपासून स्वत: पणशीकर अलिप्त होते. त्यांना त्यात बिलकुल भाग घ्यावासा वाटत नव्हता. ते या समारंभासाठी तयार नव्हते. शरीर साथ देत नव्हतं. तब्बेतीच्या तक्रारी चालूच होत्या. मनही या सोहळयासाठी राजी नव्हतं. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना आग्रह करून पाठपुरावा केला असता आणि ‘हा समारंभ करणे ही तुमच्यापेक्षा आमची भावनिक गरज आहे. आमच्यासाठी आम्हाला हा सोहळा पार पाडू द्या’ अशी गळ घातली असती तर त्यांचा होकारही मिळविता आला असता आणखी एक संस्मरणीय समारंभ झाला असता. पणशीकरांची इच्छा नव्हती ते नसताना त्यांची स्मृती जागवीत चौदा मार्चचा दिवस पार पडला. ‘नाटक चालू असताना रंगमंचावर काम करताना मरण यावं.’ असं अवघं आयुष्य रंगभूमीसाठी वेचलेल्या कुठल्याही कलावंताला वाटेल पण त्यासाठी शंकर घाणेकरांसारखं रंगभूमीवरचं मरण चटका लावून जातं.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: