Saturday, March 5, 2011

खेकडा भजी

साहित्य:


१) कांदे                    ५-६
२) डाळीचे पीठ        २ वाटया
३) तिखट                 २ चहाचे चमचे
४) हळद                   अर्धा चमचा
५) तेल
६) मीठ                    चवीनुसार


पूर्वतयारी:

१. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. त्यावर तिखट, हळद, मीठ व चार टेबलस्पून तेल गरम करून घालावे.
२. हाताने थोडे कालवून १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.

कृती:

१. १५-२० मिनिटांनी मिश्रणावर डाळीचे पीठ घालावे व हलक्या हाताने मिसळावे.
२. कांद्याला सुटलेल्या पाण्यात पीठ मिसळेल. वेगळे पाणी वापरू नये.
३. कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कांदा हाताने मोकळा करून भजी घालावी व खरपूस तळून घ्यावीत.

टीप:

१. ही भजी जरा झणझणीत चांगली लागतात. आवडत असल्यास २-३ मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.
2.. भजी खूप तापलेल्या तेलात तळू नयेत. काळपट दिसतात व कांदा करपून भजी कडवट लागतात.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: