Saturday, March 5, 2011

देवाचे अस्तित्त्व भाग-१, माझी लेखनगिरी, जेष्ठ क्रीडा-सिने-ललित पत्रकार, द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख

"एकदा या देव देव करणा-या मंडळींबद्दल लिही. त्यांची रेवडी उडव. अरे बसमध्ये, ट्रेनमध्ये पूर्वी कोडी सोडवण्यात तल्लीन झालेली माणसं दिसत. आता कोण पोथी वाचतं, कोण शनीमहात्म्य वाचतं. देवळासमोरच्या रांगा पाहून तर वीट येतो."
संकष्टीला चंद्रोदय झाल्याशिवाय न जेवणारा माझा मित्र परवा मला तावातावानं सांगत होता. "हे हे तू म्हणावंस? तू असं म्हणणं म्हणजे ‘हल्ली सिनेमात काय ती अश्लील गाणी आणि नाच असतात’ असं करिश्मा कपूर गोविंदाने तिटकारा येऊन म्हणण्यासारखं आहे."
तो मित्र काही हटायला तयार नव्हता. तो वाद घालायलाच लागला. "मी देव मानतो. काही उपासतापास करतो, पण ऊठसूट मी देवाकडे धावत नाही. माझे प्रयत्न संपले की शेवटी देवावर हवाला सोडतो. पण आज भलतंच दिसतं." मी त्याला म्हटलं, "श्रध्देची टिंगल उडवावी असं मला वाटत नाही. देव नावाची शक्ती असावी असं मानणा-यांपैकी मी सुध्दा आहे. त्यामुळे या विषयावर थोडं खोलात जाऊन लिहावं असं मला वाटतं." म्हणूनच हा प्रपंच.

परमेश्वराचा शोध घेणं ही माणसाची जुनी प्रवृत्ती आहे. ‘देव’ ही संकल्पना जवळजवळ जगातल्या प्रत्येक संस्कृतीत सापडते. मग कुणी त्याला ‘अल्ला’ म्हणतात, कुणी त्याला ‘आकाशातला बाप’ वगैरे समजतात. हिंदू त्याला शब्दात व्यक्त न करता येणा-या ब्रह्मन् पासून शंकर, विष्णू, दत्त वगैरे अनंत नावाने ओळखतात.
 
 
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: