Wednesday, March 23, 2011

विवाह - समारंभ की बांधिलकी?, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेख

लग्नाचा सिझन आला की, पत्रिका, आमंत्रणे सुरू होतात. साधारणपणे आपल्या समाजातील लग्ने एकाच प्रकारची असतात, फुलांची आरास, दिव्यांची रोषणाई, भव्य मंडप आणि पंच पक्वान्ने, एकत्र आले की समारंभाचे रूप येते. जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. अनेक नातेमंडळी भेटतात. एकमेकांची खुशाली घेतात. वधु-वरांना आशिर्वाद देतात. शुभ मुहूर्तावर देव-ब्राह्मणांच्या साक्षीने, परंपरेप्रमाणे लग्न विधी पार पडतो. विवाह समारंभाच्या सुखद आठवणी मनामध्ये राहतात आणि फोटोमध्ये पण साठवल्या जातात. थोडेफार कर्ज, थोडीफार ओढाताण ही गृहीतच धरलेली असते. घाम गाळून कमावलेला पैसा समारंभात उधळण्यात खर्च झाला तरी कोणाला त्यात फारसे गैर वाटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवाहाच्या दिवशी समारंभ का करतात, असा प्रश्नसुध्दा विशेष कोणाला पडत नाही. खरे तर त्या दिवशी विवाह विधी उरकून घ्यावा आणि नंतर ८ दिवसांनी सर्वांना बोलावून स्वागत समारंभ करावा.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: