Wednesday, March 23, 2011

विमा चालू ठेवण्यासाठीच काढायचा असतो, दामदुप्पट, गुंतवणूक सल्लागार, मनोहर दांडेकर यांचा लेख

मोठा विमा काढायचा असेल तर आपण आपले दैनंदिन खर्चातून काय बचत करता येईल याचाच फक्त विचार करून चालणार नाही. उलट आपल्याला किती किंमतीचा विमा पाहिजे ते पाहून त्याप्रमाणे विमा काढला पाहिजे. आपल्याला आयकर भरायला नको म्हणून विमा एजंटांना भेटणे आणि विमा काढणे हा निव्वळ अशिक्षितपणा आहे. मुळात ही अतःप्रेरणा ही केवळ क्षणिक कारणामुळे आलेली असते तशीच ही नवीन आर्थिक वर्षात लगेचच विरून जाते. विमा चालू ठेवण्यासाठी जी उर्मी वाटायला हवी ती मुळातच नसल्याने विम्याचा पुढच्या वर्षीचा हप्ता चुकतो, जवळ जवळ सर्वच विम्याचा लॉकिंग काळ हा कमीत कमी 3वर्षांचा असतो त्यामुळे सदर विमा दुस-याच वर्षी बाद होतो. व त्यामुळे कोणाचाही फायदा होत नाही. विमेदाराचे पैसे जातात, विमाप्रतिनिधीचे प्रयत्न जातात तर विमाकंपनीचे प्रशासकीय कष्ट वाया जातात. त्यापेक्षा जर आयकर भरला तर निदान तो पैसा देशाच्या उभारणीस कामाला येऊ शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. विमा बंद करण्याची कारणं अनेक असू शकतात पण केवळ विचार न करता अचानक काढलेला विमा हे त्यातील मूख्य कारण असते. जवळ जवळ अर्ध्याच्या वर लोकांना आपण घेतलेल्या विम्याबद्दल काहीही माहिती नसते असे दिसते. काही वेळेला तर विमाप्रतिनिधी एखादी रक्कम बिनदिक्कतपणे ठोकून देतो. त्या रकमेचे गणित हे पूर्वीच्या अनुमानांवर व सरासरी असते. 

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: