रात्र रात्र झोप न येता फक्त तळमळत राहून किंवा विचार करून कोणत्याही थकलेल्या कर्जातून कोणी बाहेर पडू शकत नाही. विशिष्ट नियोजन केल्याशिवाय यातून बाहेर पडता येऊच शकत नाही. कर्जदाराला याची जाणीवच झाली नाही तर मात्र या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याच्यापासून फार दुर आहे हे निश्चित. ज्या बँकेचे कर्ज किंवा क्रेडिट कार्डाचे पैसे थकले असतील आणि त्या बँकेकडून किंवा अशा आर्थिक संस्थेकडून कर्जदाराचा वारंवार पाठपुरावा चालला असेल तर अशा कर्जदाराला अक्षरशः जीव नकोसा होऊन जातो. त्यामुळे तो सतत वसुली अधिका-यांपासून दूर पळत राहतो. एखाद्याची सहन करण्याची ताकद नसेल तर मात्र आत्महत्येपर्यंत मजल जाऊ शकते. शेतकरीही अशाच प्रकारे केवळ लोकं काय म्हणतील म्हणून मिळेल त्या व्याजदराने भरपूर कर्ज घेऊन वारेमाप खर्च करतात आणि अशा वेळेला पिक जर का हातातून गेलं तर आता कर्ज फेडता येणार नाही अशा समजुतीने बरेचदा शेतकरी आत्महत्या करतात ते ही अशाच कर्जाखाली दबले गेल्यामुळेच. कोणत्याही कर्जाचा डोंगर कमी करायचा असेल तर त्यासाठी एक सुसूत्र योजनाच करावी लागते.
मुळात कर्ज घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला लागतात.
आपल्या कर्जाची जरूरी ओळखा म्हणजे ते आवश्यक आहेच का? आणि आत्ताच हवे आहे का? केवळ कर्ज मिळतंय म्हणून जास्त मोठं घर घेणे किंवा जरूरीपेक्षा मोठी गाडी घेणे किंवा क्रेडीट कार्ड आहे म्हणून दिसेल ती वस्तू विकत घेत सुटणे इत्यादी टाळावे. शक्यतो कर्ज घेणं थोडं पुढे ढकलता येऊ शकते का हे पाहावं आणि तेवढया वेळात स्वतःचे थोडे फार पैसे साठून कर्जाचा भार थोडा फार कमी होऊ शकतो. समोरची बँक देते आहे म्हणून कुवतीपेक्षा जास्त कर्ज अजिबात घेऊ नये. राष्ट्रीयकृत बँका कर्जदाराच्या कुवतीपेक्षा कधीही जास्त पैसे देत नाहीत.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment