Tuesday, March 1, 2011

नेहमीचे, तरीही वेगळे व आरोग्यदायी, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख

आज आपण ज्या अन्नपदार्थांची चर्चा करणार आहोत, ते अन्नपदार्थ आपल्या परिचयाचे आहेत, ते क्वचित वेगवेगळ्या प्रसंगी सेवनही केले जातात, परंतु त्याचा उपयोग वारंवार करावा इतके ते आरोग्यदायी आहेत. ते आहेत ओट (Oat), सातू(Barley), राजगीरा (Amaranth) व शिंगाडा(Water Chestnuts).

सगळ्यात आजकाल आरोग्याबाबत जागरूक असणा-यांत ओट खूपच प्रसिध्दी पावू लागले आहे. परंतु काही वर्षांनी हे बाकीचे तीन अन्नपदार्थ प्रसिध्दी पावले तर आश्चर्य वाटायला नको. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात ज्या विकारांचा उल्लेख प्रामुख्याने झाला आहे त्यात हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब व सांधेदुखी तसेच कर्करोगासारख्या गंभीर विकाराचाही झाला आहे. विकासाच्या ओघात मानवाने ओढवून घेतलेल्या या विकारांचे स्वरूप आज फारच गंभीर रूप धारण करू लागले आहे. याची कारणमिमांसा पाहिली तर त्यात चुकीच्या आहारपध्दतीचा नंबर सर्वात वर लागतो. अशी आहारपध्दत बदलायची म्हणजे सेवन केल्या जाणा-या अन्नपदार्थांत बदल. त्यातही विकारांची लक्षणे उदभवू नयेत म्हणून व विकार जडला असेल तर आहार बदलून त्यात हळूहळू आरोग्यदायी सुधारणा व्हावी म्हणून काही पदार्थांचे जाणीवपूर्वक सेवन करणे हिताचे ठरते.

पूर्वी फारच क्वचित वापरले जाणारे ओट आता आरोग्यात सुधारणा करणारे व विकारांना आळा घालणारे म्हणून मान्यता पावू लागले आहे. याचे कारण हृदयविकार व मधुमेह यात होणारी लक्षणीय वाढ हेच आहे. ओट हे तृणधान्य त्यातील विरघळणा-या व न विरघळणा-या तंतू (Fibre) साठी प्रसिध्द आहे. त्यातील विरघळणा-या तंतूंमुळे कोलेस्टेरॉल व रक्तातील साखर कमी होते, व न विरघळणा-या तंतूंमुळे मलावरोधाचा त्रास कमी होऊन पोट साफ होण्यात मदत होते.

लेख- लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: