Wednesday, March 2, 2011

शहीदांचे खरे वारसदार कोण?, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेख

१५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग केला. महाबलाढय इंग्रजांना हाकलवून लावले. काहींच्या घरादाराची राख रांगोळी झाली. काही शहीद झाले. काही मात्र अनामिकच राहीले. १ ऑक्टोबर १९४९ ला चीन स्वतंत्र झाला. त्या देशाने प्रजासत्ताक मार्ग स्वीकारून समाजवादाकडे घोडदौड सुरू केली. जागतिक पातळीवर १९४८ साली सर्वाधिक लोकसंख्या असणा-या चीनचे शेती उत्पन्न जगात सर्वात खाली होते. औद्योगिक विकास शून्य होता. निरक्षरता ८० टक्के पेक्षा अधिक होती. सर्वसाधारण चीनी माणसाचे आयुष्यमान ३५ वर्षापेक्षा खाली होते. देशातील लागवडीयोग्य जमिनीपैकी ८० टक्के जमिनदारांच्या ताब्यात होती. कोटयवधी जनता नशेच्या आहारी गेली होती.

इंग्रजांनी अफू विकण्यासाठी या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशाची निवड केली. अठराव्या शतकात चीनचा मोठा भाग अफूच्या आहारी गेला होता. अफूने देशाच्या आर्थिक आणि सैनिकी शक्तीची पूरती वाट लावली होती. इथूनच चीनी अध:पतनाला सुरूवात झाली. १८४० मध्ये आणि त्यानंतर पुन्हा १८५६ मध्ये अफूच्या युध्दात चीनला अत्यंत मानहानीचा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे इंग्रजांना अफू विकण्याचे अमर्याद स्वातंत्र्य मिळाले. त्याशिवाय महसूल उत्पन्नाचा बहुतांश भाग सुध्दा इंग्रजांना मिळू लागला. त्यानंतर १८९४ मध्ये जपानने तैवानचा लचक तोडला. १९०० मध्ये आठ देशांनी एकत्र येऊन चीनला लुटले. १९३० मध्ये पुन्हा जपानने युध्द पुकारले आणि १९४० मध्ये पुन्हा जपानने हल्ला करून चीनी जनतेला जर्जर केले. अखेर १९४५ मध्ये जपानचा आणि नंतर १९४९ ला चिऑंग कै शेकचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाने सत्ता हाती घेतली.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: