Wednesday, February 16, 2011

दुधाचे दर पुन्हा वाढणार?

गेल्या महिन्याभरात दुधाच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत असून आज पून्हा १ रुपयाने दुधाचे दर वाढवण्यात आले.  दुध उत्पादक शेतक-यांची शिखर संस्था महानंद ने गायीच्या दुधाच्या दरात १६ फेब्रुवारीपासून ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  आश्चर्याची बाब म्हणजे सरकार या दरवाढी विरोधात संपूर्णपणे निष्क्रीय आहे तर विरोधकही या प्रश्नावर एक अक्षरही काढत नाही आहेत.  शेतक-यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी यातील किती पैसा शेतक-यांच्या खिशात तर किती पैसा दुधसंस्था सांभाळणा-या राजकारण्यांच्या खिशात जाईल याविषयी सुज्ञास सांगायला नकोच.

चाफा

No comments: