Wednesday, February 16, 2011

नेतृत्व करता येत नाही, व्याख्याता, लेखक, लॉजिकल थिंकिंग, सदाशिव खानोलकर यांचा लेख

नेतृत्व करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नक्कल करणे, अभिनय करणे, टेंभा मिरविणे, हुकुमत गाजविणे, खोटा मोठेपणा. नेतृत्व हे नेहमीच विचारांचे असते. स्वाभाविक विचार हे बहुदा वास्तववादी आणि प्रागतिक असतात. पूर्व अनुभव आणि इतिहास समजून घेऊन भविष्यात कोणत्या शक्यता आहेत, आपल्याला काय अपेक्षित आहे, काय शक्य आहे, ते ठरवावे व त्याप्रमाणे करावे. ठरविणे आणि करणे, केलेल्या कार्याचे मूल्यांकन करणे, नव्याने दिशा व गती ठरविणे म्हणजे नेतृत्व. नेतृत्व स्वत:चे आणि स्वत:बरोबर इतरांचे होत असते.

साधारणपणे वडीलधारी कमावणारी व्यक्ती घरात नेतृत्व करते. पैसे कमावणे, पैसे राखणे, अग्रक्रम ठरविणे आणि एकाच वेळी सर्व घराचा विचार करणे या गोष्टीमुळे नेतृत्व गुण वाढीस लागतो. जबाबदारीची जाण व प्रमाणात नेतृत्व यशस्वी होते. जे घरात, तेच व्यवसायात-नोकरीत. सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारण नेतृत्व प्रस्थापित होण्यासाठी विशेष अभ्यास असावा लागतो. शोधक बुध्दी, मनाचा मोकळेपणा, बांधीलकीची जाण या बरोबरच मिळालेले पद ही संधी समजून, त्याचा उपयोग करण्याची जाण आवश्यक असते. सामाजिक दृष्टीकोनासाठी स्वत:ला समाजाच्या सर्व बंधनातून मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे तितकेसे सोपे नसते. सामाजिक हितासाठी काही वेळा बहुसंख्यांची मते समजून घेऊन त्यासाठी काही काळ कार्यरत राहावे लागते. समाजाच्या हिताचे काय, हे कळणे सोपे नसते. प्रामाणिकपण, कृतीशीलता असेल तर ब-याच वेळा सहका-यांकडून मार्गदर्शन मिळते. कार्यसिध्दिस जाते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: