Thursday, February 17, 2011

सुखी माणसाचा सदरा भाग-२०, प्रवचनकार, निसर्गोपचार तज्ज्ञ, क. वि. नाशिककर यांचा लेख

सुख दु:खे समे कृत्वा। लाभा लाभौ जयाजयौ॥ (गीता २:३८)

प्रार्थनेमुळे मन प्रसन्न होते. प्रसन्न मनच ईश्वर प्राप्ती करून देऊ शकते. म्हणूनच तुकोबा म्हणतात, "मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण॥ भागवतात सुध्दा भगवंत हेच सांगत आहेत की बंधनाला व मोक्षाला मनच जबाबदार आहे.

"मन एवं मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो॥"
या करिता मन प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शरीरावर मनाचा फार मोठा प्रभाव पडत असतो. मन प्रसन्न नसेल तर शरीराला अनेक आजार जडू शकतात. तर शरीराला व्याधी निर्माण झाली तर त्याचे परिणाम मनावर होतात. मन उदास होते, मनुष्य मनाने चिडचिडा होतो. जशा शरीराला अनेक व्याधी होतात तसेच मनात काम, क्रोध, मोह, मद, मत्सर व लोभ हे षडरिपू तसेच चिंता, भय, तणाव (Tenssion) ह्या मानसिक व्याधी जडतात. परिणामत: खाल्लेल्या अन्नाचे रक्त न बनता पित्तदोष निर्माण होऊन अनेक व्याधींचे माहेर घर बनते. या करिता मन प्रसन्न असणे गरजेचे ठरते.

शरीराचे डॉक्टर्स खूप आहेत. पण मनाचे? आता आज काल मनोवैज्ञानिक असतात. पण त्यांचा आवाका फारच छोटा आहे. असंतुलित झालेल्या मनाला संतुलित करू शकतील. पण मनाचे नमन होण्याचे कार्य केवळ प्रार्थनाच करू शकते. मनाचे कार्य म्हणजे संकल्प विकल्प करणे हे होय. तेव्हा प्रथमत: विकल्प करणे सुटले पाहिजे व पुढे तर संकल्प सुध्दा नकोत. पण हे कसे साध्य होणार? तर केवळ प्रार्थना व नाम:स्मरणामुळेच हे सहज शक्य होते. परंतु येथे एक पथ्य सांभाळायला हवे आणि ते म्हणजे या प्रार्थनेचा आम्हाला अहंकार होता कामा नये. हा अहंकार सुध्दा प्रार्थनेनेच घालविता येतो.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: