Wednesday, February 9, 2011

देवपूजा, माझी देवपूजा, लॉजिकल थिंकिंग, व्याख्याता, लेखक, सदाशिव खानोलकर यांचा लेख

१. स्वत:ची सुरक्षितता हाच आपला खरा देव आणि हेच आपले दु:ख
२. मी आणि माझे यांनीच सत्याला झाकून टाकले आहे.
३. प्रत्येकजण आपल्या कल्पनांच्या, आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी एक साधन या रितीने देशाचा, गरीब जनतेचा किंवा ईश्वराच्या नावाचा उपयोग करून घेतो. वस्तूत: या सर्व गोष्टींचे केंद्र तो स्वत:च असतो.
४. सरळ मनाच्या माणसालाच देवाची भक्ती करणे शोभून दिसते.
५. धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे, यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार ग्रंथ नसून मानवी अंत:करण आहे.
६. माणसाला जर सुखासमाधानाचे जीवन मिळाले, त्याला पूर्ण स्वास्थ लाभले तर तो त्या विश्वनियंता परमेशवराकडे किंचीतही पाहणार नाही.
७. विश्वोत्पत्ती केवळ कार्यकारणाच्या नियमांनी झालेली आहे. त्यात दैवी योजना नाही किंवा देवाचा हातही नाही.

 संत तुकाराम म्हणतात:
१. उध्दरीले कुळ, आपण तरला। तोची धन्य झाला त्रैलोक्यात॥
२. जैसी गंगा वाहे, तैसे त्याचे मन। भगवंत जाण तया जवळी॥
३. वस्तूते ओळखा, सांडा रे कल्पना। नका आडरानी जाऊ क्षणी॥
४. आपुलीया जीवे, शिवासी पाहावे। आत्मसुख घ्यावे वेळोवेळी॥
५. शांती करा तुम्ही, ममता नसावी। अंतरी असावी भूतदया॥


रामदास स्वामी म्हणतात:
१. ज्याच्यावर मायेमुळे खोटा आळ आला. जो कधी आलाच नाही. त्या रूप नसलेल्याला रूप कसले?
२. त्याच्या गुणवर्णाचा विचार, रूप नसलेल्याला रूप येणार नाही. तरी पण भावनेच्या बळावर मी आपला त्याला नमस्कार करतो.
३. जे शब्दाने कळत नाही, जे शब्दाशिवाय पण कळत नाही. जे केवळ असेही घडत नाही, जे स्वत:च्या रूपात एक होऊन जाते.
(आत्माराम, समास पहिला - त्याग निरूपण)

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: