Wednesday, February 9, 2011

गुंतवणूक कशी व कशासाठी, दामदुप्पट, गुंतवणूक सल्लागार, मनोहर दांडेकर यांचा लेख

मिळालेल्या उत्पन्नातील काही भाग आवश्यक खर्चांवर खर्च करून उरलेले पैसे साठवून पुन्हा त्यावर काही परतावा मिळविण्यासाठी त्याची योग्य व विशिष्ट कालासाठी केलेली गुंतवणूक. आपल्याला स्वतः काम करून काही जीवनभर उत्पन्न मिळणार नाही. उलट आपल्या आयुष्याच्या जास्तीतजास्त 60 ते 65 वर्षापर्यंतच आपण काम करू शकतो.

त्यानंतर मात्र काही मोजक्या लोकांना पेन्शन त्याच्या नोकरीच्या ठिकाणाहून मिळते. तर ब-याच लोकांना फक्त एक विशिष्ट रक्कमच त्याच्या त्या नोकरीतून त्यांना मिळते. पण या सर्व प्रक्रीयेतून मिळणारे कायमस्वरूपी उत्पन्न किंवा एकदाच मिळणारा प्रॉव्हिडंट फंड या रकमा त्याला त्याच्या उर्वरीत आयुष्याला पुर्णपणे हातभार लावण्यास समर्थ नसतात. त्यासाठी अशा भरपूर गुंतवणूकीची आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासूनच फार आवश्यकता असते.

मी असेन तर उत्पन्न असेल या सत्य विधानापासून आपल्याला दूर जाता येत नाही. म्हणूनच आपण उत्पन्न मिळवायला लागल्या लागल्या सर्वप्रथम विम्याचाच विचार करायला पाहिजे. आपण त्यासाठी नेहमी टर्म इन्शूरन्सचा पर्याय यासाठी निवडत आलो आहोत. कारण जास्त विम्यासाठी अगदी नगण्य हप्ता या विम्यासाठी भरावा लागतो. जर का या मुदतीत विमेदाराचा मृत्यु ओढवला तर मात्र विमा कंपनी ठरलेली विमा रक्कम देते पण जर का त्या विम्याच्या मुदतीअखेरही त्या व्यक्तीला काहीही झाले नाही तर मात्र हा विमा करार संपतो व तुम्हाला कोणतीही रक्कम परत केली जात नाही. त्यामुळे याला ब-याच लोकांचा विरोधच असतो.


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: