मरण यातनेवरील उपाय
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
जीवनाची यथार्थता समजली की मृत्यूचे भय आपोआप कमी होते. अत्यंत श्रेष्ठ असा हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. तो केवळ ऐषोआरामाकरिता नसून मनुष्य जीवनाची सार्थता करण्याकरिता आहे. १) धर्म २) अर्थ ३) काम ४) मोक्ष ह्या चार पुरूषार्थाच्या प्राप्तीतच त्याची सार्थकता आहे.
इतर सर्व योनी मध्ये केवळ १) आहार २) विहार ३) भय ४) मैथुन ह्या चार गोष्टी शिवाय दुसरे काहीच नाही. कारण इतर सर्व योनी ह्या केवळ भोग योनी असून तेथे पाप पुण्य हा प्रकारच नाही. परंतु मनुष्य जन्म प्राप्त झाला असता परमार्थाची वा मोक्षाची प्राप्ती हेच सर्वोच्च ध्येय असते. परम म्हणजे उच्च कोटिचे व अर्थ म्हणजेच प्राप्तव्य हा त्याचा अर्थ (meaning) आहे. यालाच मोक्ष, कैवल्य अथवा ज्ञान असे म्हणतात. तेव्हा असा सर्व श्रेष्ठ जन्म प्राप्त झाला असता जर आपण आपल्या स्वरूपाची म्हणजेच ईश्वराची प्राप्ती करून जर घेतली नाही, तर आपल्या सारखे पतीत आपणच ठरू. पतीत म्हणजे केवळ पापी हाच अर्थ नसून जो स्वरूपापासून ढळला तोच पतीत होय. पतीताची व्याख्या समर्थांनी केलेली आहे.
ज्याने संसारी घातले। अवघे ब्रह्मांड निर्माण केले।
त्यासि नाही ओळखिले। तोचि पतीत॥ (दासबोध) म्हणूनच मनुष्याने आपले हित साधून घ्यावे याचाच अर्थ स्वरूपाची ओळख करून घ्यावी ती आमची मिरासदारी म्हणजेच जन्मसिध्द हक्क आहे. स्वरूपाची ओळख झाली की मनुष्य सुखरूप होतो. ज्याला पुन्हा-पुन्हा सुखी व्हावे लागत नाही, त्यालाच सुखरूप म्हणायचे याच करिता मनुष्याने परमात्म तत्व जाणून घ्यावे. पण तसे होत नाही. समर्थ सांगतात,
लोक नाना परीक्षा जाणती। परी अंतर परीक्षा नेणती।
तेणे प्राणी करंटे होती। देखता देखता॥(दासबोध १२:२:२५)
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment