Wednesday, February 2, 2011

राशी-भविष्य

मेष
दशमस्थानातील मंगळ बुध व चंद्र युती व्यापार उद्योगात आघाडी देतील. नवीन संकल्पना आपण धंद्यात उतरवाल. त्याचा आपल्याला फायदाच होईल. नोकरीत वरीष्ठ खूश असतील.

वृषभ
आज नोकरीवर नेहमीचा उत्साह नसेल. कामाला दांडी मारावी वाटेल. उद्योग धंद्यात काही नवे घडणार नाही.

मिथुन
आज प्रकृतीची काळजी घ्या. शरीराला गरम पडतील असे पदार्थ टाळा. काही पथ्ये पाळत असाल तर त्याकडे कानाडोळा करू नका. व्यवहार जपून करा. थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क
आज आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवाल. आपले मन निःसंकोचपणे त्याच्यासमोर मोकळे कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवू शकाल.

सिंह
नोकरीच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता. शक्यतो आपण इतरांच्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका. इतरांचे चुकत असेल तर त्याकडे काणाडोळा करून आपले काम करा त्यामुळे वादविवाद टाळता येईल.

कन्या
आज जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याचा संभव आहे परंतु तो आपण सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. खरे काय ते जाणून घ्या, समजून घ्या उगाचच वाद वाढवून नका.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: