Thursday, February 3, 2011

काजूगराची उसळ


साहित्य:

१) काजूगर २ वाटया
२) कांदे ३
३) बटाटे २
४) सुके खोबरे अर्धी वाटी
५) टोमॅटो २
६) आलं पेस्ट अर्धा चमचा
७) कोथिंबीर
८) मीठ
९) तेल
१०) हळद
११) तिखट
१२) गरम मसाला

पूर्वतयारी:

१. काजूगर सोलून घ्यावेत. टोमॅटो-बटाट्याच्या फोडी कराव्यात.
२. एक कांदा बारीक चिरावा.
३. उरलेला कांदा व सुखे खोबरे तेलात परतून बारीक वाटून घ्यावे.

कृती:

१. कढईत अर्धी वाटी तेल तापवून कांदा मऊ करून घ्यावा.
२. त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावी. त्यात टोमॅटो परतावा.
३. काजूगर व बटाटे घालावेत. हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घालावे.
४. १० मिनिटांत भाजी शिजेल. रस्सा दाट ठेवावा.
५. नंतर कोथिंबीर घालावी. गॅस बंद करावा.
६. भाताबरोबर ही गरमागरम उसळ छान लागते.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: