साहित्य:
१) मोडाची मटकी पाव किलो
२) मिक्स फरसाण पाव किलो
३) कांदे पोहे १ वाटी
४) दही अर्धा किलो
५) शेव १०० ग्रॅम
६) तिखट चटणी
७) बटाटे २
८) कांदे २
९) टोमॅटो १
१०) कोथिंबीर
११) चिंचेची चटणी(गोड)
पूर्वतयारी:
१. मोड आलेली मटकी व बटाटे उकडून घ्यावेत.
२. बटाटे उकडून त्याच्या फोडी कराव्यात. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे.
कृती:
१.. एका पातेल्यात फोडणी करून थोडा काळा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ घालून उसळ करावी. रस जास्त ठेवू नये.
२. मिसळ करायला खोलगट डिशमध्ये प्रथम मिक्स फरसाण घालावे. त्यावर १ चमचा पोहे, बटाटयाच्या फोडी व १ डाव उसळ घालावी.
३. मग १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी. १ चमचा गोड चटणी, १ चमचा तिखट चटणी घालावी.
४. वर बारीक शेव घालून २ डाव गोड घट्ट दही घालावे व मिसळ खाण्यास द्यावी.
द्क्षता:
१. मुलांना द्यायची असेल तर उसळ कमी तिखट करावी व तिखट चटणी घालू नये.
२. दह्यामुळे चविष्ट लागतेच पण खूप तिखट व जळजळीत होत नाही. ह्या मिसळीबरोबर ब्रेड द्यायचा नाही.
३.. मटकी ऐवजी मोडाचे मूग व इतर कडधान्ये वापरली तरी चांगली लागते व पौष्टीक लागते.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment