Monday, February 7, 2011

सातवी वास्तू - घरातील वस्तू गायब आणि थांगपत्ता केवळ वास्तूला भाग-२, वास्तुअभ्यास, प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ, रविराज अहिरराव यांचा लेख

सगळा प्रकार बघून ऐकून माझे डोके सुन्न झाले होते. त्यांचे बायकोला शिव्या घालणे चालूच होते. त्यांना म्हटले तुम्ही आता जरा शांत बसा. मला ज्या कामासाठी बोलाविलेय ते काम आधी आपण पूर्ण करूया. इथे आल्याआल्याच मी तुम्हाला तुमच्या संबंधाबद्दल सांगितले, मला घडलेली गोष्ट माहित होती का?

जे काही घडले त्यात तुमच्या मिसेसची चूक निश्चितच आहे परंतु त्या गोष्टीला तुमचे घरही तेवढेच जबाबदार आहे. नैऋत्य दिशेत इतके वास्तुदोष आले की मॅरिटल रिलेशनला प्रॉब्लेम येतोच. त्यांना म्हटले मला एक सांगा मिसेसच्या हातून चूक घडली, चूकीची कबूलीही दिली. त्यासाठी त्यांनी तुमची माफिही मागितलीय व पुन्हा तसे परत कधीही होणार नाही याची हमीही दिली. मग मोठया मनाने तुम्ही त्यांना माफ केलेत तर काय बिघडेल? माझ्याकडे अनेक केसेस आहेत ज्यामध्ये कित्येक स्त्रीयांच्या नव-यांचे बाहेर अफेअर होते त्यांच्या घरचे वास्तुशास्त्र केल्यानंतर नव-याला त्याची चूक कळली तेव्हा त्या स्त्रीयांनी नव-याला मोठया मनाने माफ केले मग तुम्ही जर तुमच्या बायकोला एक संधी दिली तर काय हरकत आहे? असे कसे? त्या स्त्रीया होत्या. मी पुरूष आहे. मी कसे माझ्या बायकोला माफ करू शकेन? मी म्हटले का काय प्रॉब्लेम आहे? स्त्रीयांना काही मन नसते का? स्त्री, पुरूष दोन्हीही सारखेच असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे मला एक सांगा की तुमचे तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे, सुटया संपल्यावर ती इकडे येणारच, मग ती तिच्या आईबद्दल विचारणार नाही का? तिला तुम्ही हे सगळे सांगणार आहात? या गोष्टींचा तिच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा. होय. तो प्रश्न तर मलाही सतावतोयच आहे, पण हिने असे घाणेरडे काम करावेच कशाला?

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या http://chapha.com/Sadar/Sadar_ArticleDetails.aspx?artcode=407&autcode=3



No comments: