Wednesday, February 2, 2011
कुर्ल्या मसाला
साहित्य:
१) कुर्ल्या ६
२) खोबरे (सुके) १ वाटी
३) कांदे २
४) हिरवी मिरच्या ४
५) हळद १ चमचा
६) मिरी ८
७) थोडी खसखस
८) कोकम
९) लसूण पाकळ्या ८
१०) आलं
११) कोथिंबीर
१२) मालवणी मसाला २ चमचे
१३) लवंगा ४
१४) मिरी
१५) धणे
१६) मीठ
पूर्वतयारी:
१. कुर्ल्या साफ करताना त्यांचे डेंगे वेगळे काढून घेणे.
२. मोठे डेंगे तसेच ठेवून फक्त छोटे डेंगे मिक्सरमध्ये घालून त्यांचा रस काढून गाळून ठेवावा.
३. कांदा उभा चिरून तेलात लालसर होईपर्यंत परतावा. फोडणीसाठी थोडा कांदा बाजूला ठवावा.
४. त्यातच सुके खोबरे व गरम मसाला त्या कांद्यात परतावा. नंतर हे सर्व बारीक वाटावे.
५. आलं,लसूण,मिरची व कोथिंबीर हे ही बारीक वाटून घ्यावे.
कृती:
१. एका पातेल्यात तेल टाकून ते चांगले तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
२. नंतर त्यात साफ केलेल्या कुर्ल्या मोठे डेंगे, हिरवे वाटण, मालवणी मसाला आणि हळद टाकून चांगले परतावे.
३. अंदाजे थोडे पाणी घालावे. कुर्ल्या साधारण शिजत आल्यावर त्यात कांदा-खोब-याचे वाटण, २ कोकम व मीठ घालावे.
४. चांगली उकळी आल्यावर त्यात डेंग्यांचा रस घालावा. पातेल्यावर झाकण ठेवायला विसरू नये.
५. कुर्ल्या शिजल्यावर गॅस बंद करावा.
६. वाढताना थोडी कोथिंबीर घालणे.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment