Wednesday, February 2, 2011

मुलांनाही गुंतवणूकीची सवय लावा गुंतवणूक सल्लागार मनोहर दांडेकर यांचा लेख


लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांच्या शिदोरीवर प्रत्येक प्रौढ माणसाचा सामाजिक दर्जा ठरत असतो. या काळात आर्थिक सुबत्तेची आवश्यकता व त्यामुळे पुढील जीवनातील पैशांची उपलब्धता व त्याचा योग्य विनिमय याबाबत प्रत्येकाला शिकवण दिली गेली पाहिजे.

खरंतर अवघड वाटणारा व सतत बदलत असलेला इतिहास हा विषय काढून टाकून त्याऐवजी प्रत्येक शाळकरी मुलाला अर्थशास्त्रासारखा संपूर्ण जीवनभर उपयुक्त असलेला विषय शिकवला गेला पाहिजे. पण आपल्या शिक्षणपध्दतीत अशी सोय नसल्याने निदान आपण तरी मुलांना अर्थशास्त्राची ओळख करून द्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांना प्रथम छोटे छोटे व्यवहार करायला शिकवले पाहिजे. दूध, कोथिंबिर मिरच्या, दळण अशासारख्या वस्तू आणण्याची सवय लावावी. कारण अशा गोष्टींची किंमत ठरलेली असते किंवा आपण त्यांना एका किंमतीची मर्यादा दिलेली असल्यामुळे सुरवातीला आपणच त्याला दिलेले पैसे आणि त्यातून उरणारे पैसे याचा हिशेब करून घेऊ शकतो. पुढेपुढे मात्र मुलांना स्वतःला निर्णय घ्यावे लागतील किंवा हिशेब करावा लागेल अशा पर्यायी व्यवहारांची सवय लावू शकतो. यामधे बस किंवा रिक्षाने जाणे, किंमतीचा अंदाज घेऊन व आपल्याकडे किती पैसे आहेत आणी त्यात किती वस्तू येतील किंवा किती पैसे उरतील याचा हिशेब करून निर्णय घेणे. इत्यादींमुळे त्यांना पैशांचा हिशेब जमायला लागतो, व त्यांना हळूहळू या एक प्रकारच्या खेळात आनंद मिळायला लागतो.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: